Loading...

पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत विपार स्पिडिंग चिताज संघाचा फ्लाईंग हॉक्सवर संघर्षपूर्ण विजय

पुणे। पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत विपार स्पिडिंग चिताज संघाने फ्लाईंग हॉक्स संघाचा 44-42 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजयी सलामी दिली.

डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीच्या चुरशीच्या झालेल्या लढतीत पहिल्या 8वर्षाखालील मिश्र गटात विपार स्पिडिंग चिताजच्या नमिश हूडने फ्लाईंग हॉक्सच्या अंशूल पुजारीचा 4-1 असा पराभव केला; तर 10वर्षाखालील मुलांच्या गटात विपार स्पिडिंग चिताजच्या नीरज जोर्वेकरला फ्लाईंग हॉक्सच्या सक्षम भन्साळीने 0-4असे पराभूत करून संघाला बरोबरी साधून दिली.

10वर्षाखालील मुलींच्या गटात विपार स्पिडिंग चिताजच्या ध्रुवी आदयंता हिने किया तेलंगला 4-1 असे पराभूत केले. त्यानंतर12वर्षाखालील मुलांच्या गटात फ्लाईंग हॉक्सच्या तेज ओकने अर्चित धूतवर 6-4 असा विजय मिळवला.

12वर्षाखालील मुलींच्या गटात विपार स्पिडिंग चिताजच्या सलोनी परिदाने अंजली निंबाळकरचा 6-3 असा तर,14वर्षाखालील मुलांच्या गटात ईशान देगमवारने फ्लाईंग हॉक्सच्या पार्थ देवरूखकरचा 6-1 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. पण हि आघाडी फार विपार स्पिडिंग चिताज संघाला टिकवता आली नाही. 14वर्षाखालील मुलींच्या गटात फ्लाईंग हॉक्सच्या :श्रावणी देशमुखने अलिना शेखचा 6-3 असा तर, कुमार दुहेरी गटात अर्जुन किर्तने व तनिश बेलगळकर यांनी विपार स्पिडिंग चिताजच्या कृष्णा घुवलेवाला व वेदांग काळे यांचा 6-3असा पराभव करून संघाचे आव्हान कायम राखले.

त्यानंतर 14वर्षाखालील मुलांच्या दुहेरी गटात फ्लाईंग हॉक्सच्या सुधांशू सावंत व श्लोक गांधी या जोडीने ऐतरेत्या राव व केयूर म्हेत्रे यांचा 6-4असा पराभव करून हि आघाडी वाढवली. पण उर्वरित दोन सामन्यात 10वर्षाखालील मुलांच्या दुहेरीत चिताजच्या रियान माळीने वेद मोघेच्या साथीत .नीव कोठारी व रोहन बजाज यांचा टायब्रेकमध्ये 4-3(6) असा तर, मिश्र दुहेरीत विपार स्पिडिंग चिताजच्या नाव्या भामिदिप्ती व विश्वजीत सणस यांनी कौशिकी समंथा व अवनीश गवळी यांचा 6-5(5) असा पराभव करून संघाचा विजय सुकर केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

विपार स्पिडिंग चिताज वि.वि.फ्लाईंग हॉक्स 44-42
(एकेरी: 8वर्षाखालील मिश्र गट: नमिश हूड वि.वि.अंशूल पुजारी 4-1; 10वर्षाखालील मुले: नीरज जोर्वेकर पराभूत वि.सक्षम भन्साळी 0-4; 10वर्षाखालील मुली: ध्रुवी आदयंता वि.वि.किया तेलंग 4-1; 12वर्षाखालील मुले: अर्चित धूत पराभूत वि.तेज ओक 4-6; 12वर्षाखालील मुली: सलोनी परिदा वि.वि.अंजली निंबाळकर 6-3; 14वर्षाखालील मुले: ईशान देगमवार वि.वि.पार्थ देवरूखकर 6-1; 14वर्षाखालील मुली: अलिना शेख पराभूत वि.श्रावणी देशमुख 3-6; कुमार दुहेरी गट: कृष्णा घुवलेवाला/वेदांग काळे पराभूत वि.अर्जुन किर्तने/तनिश बेलगळकर 3-6; 14वर्षाखालील मुले दुहेरी गट: ऐतरेत्या राव/केयूर म्हेत्रे पराभूत वि.सुधांशू सावंत/श्लोक गांधी 4-6; 10वर्षाखालील मुले दुहेरी: रियान माळी/वेद मोघे वि.वि.नीव कोठारी/रोहन बजाज 4-3(6); मिश्र दुहेरी: नाव्या भामिदिप्ती/विश्वजीत सणस वि.वि.कौशिकी समंथा/अवनीश गवळी 6-5(5));

Loading...
You might also like
Loading...