पुणे, 18 नोव्हेंबर 2023: थर्ड आय स्पोर्टस अँड इव्हेंटस एलएलपी यांच्या वतीने आयोजित पहिल्या थर्ड आय 14 वर्षाखालील क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत पीएमपी ग्रुप पुणे क्रिकेट अकादमी संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सनराईज क्रिकेट स्कुल व सहारा क्रिकेट अकादमी येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात हर्ष पाष्टे(4-39 व 47धावा) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पीएमपी ग्रुप पुणे क्रिकेट अकादमी संघाने सहारा क्रिकेट अकादमीचा 5 गडी राखून पराभव केला. दुसऱ्या सामन्यात प्रांजली पिसे(नाबाद 110धावा) हिने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर एके स्पोर्ट्स संघाने सनराईज क्रिकेट स्कूल संघावर 99धावांनी विजय मिळवला.
निकाल: साखळी फेरी:
सहारा क्रिकेट अकादमी: 44.2 षटकात सर्वबाद 215धावा(संस्कार ढवळे 48(67,8×4), नरेंद्र इंचुरे 31, आदित्य तुळजापूरकर 29, आदित्य भोसले 22, राजवीर बनसोडे 19, हर्ष पाष्टे 4-39, उज्वल चौधरी 2-22 , ऋषभ थोरात 1-25) पराभुत वि.पीएमपी ग्रुप पुणे क्रिकेट अकादमी: 32 षटकात 5बाद 218धावा(अनुराग सिंग 58(40,11×4), हर्ष पाष्टे 47(50,9×4), श्रावण पणिकर 41(44,9×4), आनंद शेंडे 16, वरद प्रधान 2-19, तनुष उल्हाळकर 2-53); सामनावीर-हर्ष पाष्टे; पीएमपी ग्रुप पुणे क्रिकेट अकादमी 5 गडी राखून विजयी;
एके स्पोर्ट्स: 43 षटकात 3बाद 255धावा(प्रांजली पिसे नाबाद 110(94,18×4), अथर्व आखाडे 60(54,7×4), राजवीर देशमुख 35, ऋतुज कोळंबे नाबाद 16, अगस्त्य साठे 1-28) वि.वि सनराईज क्रिकेट स्कूलः 39.5 षटकात सर्वबाद 156धावा(वंश सोळंकी 29, आदित्य साठे 25, शौर्य कुबडे 24, भावेश चौधरी 19, प्रथमेश कुंभार 3-29, उत्कर्षा राणीपा 2-13); सामनावीर – प्रांजली पिसे; एके स्पोर्ट्स 99धावांनी विजयी. (PMP Group Pune Cricket Academy enters the semi-finals of the 1st Third Eye Under-14 Cricket Championship)
महत्वाच्या बातम्या –
CWC23 Final Toss: ‘रोहित असाच टॉस कर…’, पाकिस्तानला ट्रोल करत दिग्गजाने सांगितली मजेदार पद्धत, पोट धरून हसाल
World Cup 2023: Final पूर्वी मैदानी पंचाचे नाव ऐकूनच भारतीय चाहत्यांना भरली धडकी; म्हणाले, ‘पनवती अंपायर’