नुकतेच ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार टीम पेनच्या गाडीतून त्याचे पाकिट चोरीला गेले आहे. कोणीतरी गॅरेजच्या बाहेर उभ्या केलेल्या त्याच्या गाडीचे लॉक तोडून त्याचे पाकिट चोरले होते. पेनला याची माहिती नव्हती. परंतु जेव्हा त्याला त्याच्या बँकेतून मेसेज आला तेव्हा त्याला याबद्दल माहिती झाले.
पेनला बँकेकडून सतर्कतेचा मेसेज आला होता की, त्याच्या क्रेडिट कार्डचा वापर करून खूप सारी खरेदी केली जात आहे. यानंतर पेनने (Tim Paine) बाहेर उभ्या असलेल्या आपल्या गाडीमध्ये आपले पाकिट पाहिले, तेव्हा त्याला समजले की, त्याचे पाकिट चोरीला गेले आहे.
सध्या पेनने स्वत:ला आयसोलेट (Isolate) केले आहे. तसेच त्याने सांगितले की, त्याला आपल्या गॅरेजला जिममध्ये बदलायचे आहे. तो आपल्या घरातील काही सामान जिममध्ये शिफ्ट करत होता. या दरम्यान त्याने थोड्या वेळासाठी आपली गाडी गल्लीमध्ये उभी केली होती. गॅरेजचा दरवाजा उघडाच होता. त्याच वेळी कोणीतरी गाडीतून पाकिट चोरले (Wallet Stolen).
पेनने या चोरीबद्दल हसत हसत सांगितले की, “मला असे वाटले की, संपूर्ण जग कोविड-१९मुळे (Covid-19) आरोग्य आणि त्यांच्या आर्थिक परिणामांमुळे चिंतेत आहेत. परंतु मला या गोष्टीबद्दल माहितीच नव्हते. जर मला बँकेतून क्रेडिट कार्डने खरेदी करण्याचा मेसेज आला नसता तर मला याबद्दल कदाचित माहितीही झाले नसते.”
यावेळी पेनने हेही सांगितले की, “आम्हाला अशी माहिती अजूनही मिळालेली नाही की आमचा पगार कापण्यात येईल. या संदर्भात पुढील आठवड्यात चर्चा केली जाईल.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-ज्या क्रमांकाची जर्सी घातलो, तेवढेच लाख रोहितने दिले पंतप्रधान सहाय्यता निधीला
-लाॅकडाऊनमध्येही या खेळाडूंना जायचं आहे घराबाहेर, हे आहे कारण
-डेविड वाॅर्नरने या कारणामुळे केला टक्कल, चाहत्यांनी केले कौतूक