आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत गुरुवारी (2 नोव्हेंबर) भारत आणि श्रीलंका यांत लढत झाली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेची केवळ 55 धावांमध्ये दाणादाण उडवत 302 धावांनी विक्रमी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीत थाटात प्रवेश केला. भारतीय संघ या विजयामुळे उपांत्य फेरीत दाखल झाला असला तरी, उपांत्य फेरीची स्पर्धा चुरशीची होऊ लागली आहे.
यजमान भारतीय संघाने स्पर्धेत सलग सात विजय मिळवत उपांत्य फेरीत आपली जागा निश्चित केली. भारताचा रनरेट सध्या +2.10 असा दिसून येतो. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेने सात पैकी सहा सामन्यात विजय मिळवून दुसरे स्थान कायम ठेवले आहे. त्यांचे देखील उपांत्य फेरीत जाणे जवळपास निश्चित आहे. मात्र, उर्वरित दोन जागांसाठी मोठा संघर्ष होऊ शकतो.
सध्या ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड प्रत्येकी चार विजयांसह अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत. ऑस्ट्रेलियाला अजून आपले तीन तर न्यूझीलंडला दोन सामने खेळायचे आहेत. या संघाची जमेची बाजू म्हणजे त्यांचा रनरेट हा अधिकमध्ये दिसून येतो. उपांत्य फेरीच्या जागेसाठी त्यांना पाकिस्तान व अफगाणिस्तान जोरदार टक्कर देताना दिसून येतात.
पाकिस्तान संघाने आतापर्यंत सात सामने खेळताना तीन विजय व चार पराभव पाहिले आहेत. तर अफगाणिस्तानने सहा सामन्यात तीन विजय व तीन पराभव स्वीकारले आहेत. पाकिस्तानचा रनरेट काहीसा सरस असला तरी, अफगाणिस्तान नेदरलँड पराभूत करत त्यात सुधारणा करू शकते.
सातव्या स्थानी असलेल्या श्रीलंकेच्या खात्यात दोनच विजय असून त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत. तर आठव्या क्रमांकावरील नेदरलँड सहा सामन्यात दोन विजय मिळवून, अद्यापही उपांत्य फेरीच्या बेरजेत दिसून येतात. नव्या क्रमांकावरील बांगलादेश स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे. तर, आतापर्यंत केवळ एकच विजय मिळवण्यात यशस्वी ठरलेला गतविजेता इंग्लंड अजूनही आपले उर्वरित तीन सामने जिंकून उपांत्य फेरीसाठी दावा करू शकतो.
(Points Table After India v Srilanka 2023 ODI World Cup India Qualify For Semi Final)
महत्वाच्या बातम्या –
विजयाच्या सप्तपदीनंतर रोहितचे मोठे विधान, म्हणाला, “चेन्नईतून सुरुवात केली आणि आता…”
वर्ल्डकपमध्ये शमीपेक्षा भारी कोणीच नाही! विकेट्सचं पंचक घेत बनला भारताचा बेस्ट बॉलर