---Advertisement---

बुडत्याचा पाय खोलात! मालिका गमावल्याने भारतीय संघाच्या वाढल्या अडचणी

On: शुक्रवार, जानेवारी 14, 2022 11:16 PM
IND-SA
---Advertisement---

केपटाऊनच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (south africa vs India)  यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघातील फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. परिणामी, भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हा सामना दक्षिण आफ्रिका संघाने ७ गडी राखून आपल्या नावावर केला. यासह कसोटी मालिकेत देखील २-१ ने विजय मिळवला. या सामन्यात पराभूत होताच भारतीय संघाचे इतिहास रचण्याचे स्वप्नं अपूर्ण राहिले आहे. यासह भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. (Points table of icc WTC) 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेत पराभूत झाल्यामुळे भारतीय संघाला मोठा तोटा झाला. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारतीय संघ पाचव्या स्थानी पोहोचला आहे. तर मालिकेत विजय मिळवणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला गुणतालिकेत मोठा फायदा झाला आहे. हा संघ आता चौथ्या स्थानी पोहोचला आहे.

या मालिकेत पराभूत झाल्यामुळे भारतीय संघाची विजयाची सरासरी ४९.०७ टक्के इतकी झाली आहे. तर, दक्षिण आफ्रिका संघाची विजयाची सरासरी ६६.६७ इतकी झाली आहे. श्रीलंका संघ १०० टक्के विजयाच्या सरासरीसह गुणतालिकेत सर्वोच्च स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलिया संघ ८३.३३ विजयाच्या सरासरीसह दुसऱ्या स्थानी आहे. तसेच ७५ टक्के विजयाच्या सरासरीसह पाकिस्तान संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात २२३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिका संघाला २१० धावा करण्यात यश आले होते. तर दुसऱ्या डावात भारतीय संघाने आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात भारतीय संघाचा डाव अवघ्या १९८ धावांवर संपुष्टात आला होता. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघाला २१२ धावांचे लक्ष्य मिळाले होते. हे लक्ष्य दक्षिण आफ्रिका संघाने ७ गडी राखून पूर्ण केले.

महत्वाच्या बातम्या :

खालीही पडला अन् क्लीन बोल्डही झाला! लॅब्युशेनची विकेट पाहून संघसहकाऱ्यांनाही आवरले नाही हसू

सर्वकालीन महान सलामीवीराने रिषभला दिली ‘स्टँडिंग ओव्हेशन’; शतकी खेळीबाबत म्हणाला…

हे नक्की पाहा:

क्रिकेट अंपायर्सला मिळणारे मानधन| Cricket Umpire Salary

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---