वनडे विश्वचषक 2023 मधील अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान खेळला जात आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या अंतिम सामन्यात भारतीय संघाचे पहिल्या 11 षटकात आक्रमक फटकेबाजी करत 3 बाद 82 धावा वसूल केल्या. त्याचवेळी चालू सामन्यात भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहली याला भेटण्यासाठी थेट एका चाहत्याने मैदानात प्रवेश केला.
संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या या अंतिम सामन्यात भारतीय संघाने वेगवान सुरुवात केली. मात्र, पहिल्या पावर प्लेच्या अखेरीस भारतीय संघाला दोन धक्के बसले. त्यानंतर विराट कोहली व केएल राहुल यांनी भारताचा डाव सावरला. यादरम्यान भारतीय डावाच्या 14 व्या षटकात एक चाहता थेट मैदानात घुसला.
Police arrested the Palestine supporter who breached the security to enter the ground. pic.twitter.com/glpqFy7X27
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 19, 2023
या चाहत्याने विराट कोहली याला मिठी मारली. विशेष म्हणजे या चाहत्याने पॅलेस्टीन देशाच्या ध्वजाचा मास्क घातला होता. तसेच त्याने आपल्या टी-शर्टवर पॅलेस्टीन देशावरील हल्ले थांबवावेत असा संदेश दिलेला. पोलिसांनी तात्काळ मैदानात येत या चाहत्याला पकडून बाहेर नेले.
मागील काही दिवसांपासून इस्त्राइल आणि पॅलेस्टीन देशां दरम्यान युद्ध सुरू आहे. यामध्ये दोन्ही देशांकडून एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले होताना दिसतायेत. काहीसा ताकतवर असलेल्या इस्राइल देशाने पॅलेस्टीनमध्ये मोठी हानी केली असून जगभरातून पॅलेस्टीनला पाठिंबा मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर याबाबत अनेक महत्त्वाच्या बैठका होताना दिसत आहेत.
(Police arrested the Palestine supporter who breached the security to enter the ground in odi World Cup final)
हेही वाचा-
IND vs AUS: Finalपूर्वी शुबमन गिलच्या आजीची आपल्या पतीला ताकीद; म्हणाल्या, ‘एकदा मॅच चालू झाली की…’
चॅम्पियन भारतच! World Cup Final साठी विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन्सचीही टीम इंडियाला पसंती