पुणे । टायफून्स, ईगल्स या संघांनी पूना क्लब आयोजित पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला. पूना क्लबच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. पहिल्या लढतीत टायफून्स संघाने मॉव्हरिक्स संघावर २८ धावांनी मात केली. यात अश्विन शहा आणि भूषण पलरेशा यांच्या फटकेबाजीच्या जोरावर टायफून्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद १०० धावा केल्या.
अश्विनने १७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४३, तर भूषणने ११ चेंडूंत ५ षटकारांसह ३५ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मॉव्हरिक्स संघाला ३ बाद ७२ धावाच करता आल्या.
दुस-या लढतीत ईगल्स संघाने जॅग्वॉर्स संघावर १२ धावांनी विजय मिळवला. ईगल्सने प्रथम फलंदाजी करताना २ बाद ६२ धावा केल्या. यानंतर जॅग्वॉर्स संघाला २ बाद ५० धावांत रोखले. यानंतर ऑल स्टार्स संघाने टायगर्स संघावर नऊ गडी राखून मात केली. व्हेव्ज संघाने जेट्स संघावर आठ गडी राखून विजय मिळवला. यानंतर आरव विजच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर वॉरियर्स संघाने कुदो किंग्ज संघावर १६ धावांनी विजय मिळवला.
संक्षिप्त धावफलक –
१) टायफून्स – ६ षटकांत ३ बाद १०० (अश्विन शहा ४३, भूषण पलरेशा ३५, वरुण श्रीवास्तव नाबाद १९, प्रितम लुनावत १-१६) वि. वि. मॉव्हरिक्स – ६ षटकांत ३ बाद ७२ (रौनक ढोले पाटील ३०, प्रकाश कारिया २१, अश्विन शहा १-६, चेतन घुवालेवाला १-९). सामनावीर-अश्विन शहा
२) ईगल्स – ६ षटकांत २ बाद ६२ (आर्यमन पिल्ले नाबाद ३४, दिव्यांशू सेहगल १४, अनूज मेहता १-७) वि. वि. जॅग्वॉर्स – ६ षटकांत २ बाद ५० (मनप्रीत उप्पल १४, उमेश पिल्ले १-१३, आर्यमन पिल्ले १-११). सामनावीर – आर्यमन पिल्ले
३) टायगर्स – ६ षटकांत बिनबाद ७० (आर्यन गाडगीळ नाबाद ३७, अर्जुन मोताडू १६) पराभूत वि. ऑल स्टार्स – ५ षटकांत १ बाद ७३ (रोहित जाधव नाबाद ४७, अली हाजी नाबाद २३, अयान खान १-९). सामनावीर – रोहित जाधव
४) जेट्स – ६ षटकांत ३ बाद ५८ (पुनीत सामंत ३५, सर्वेश मुथा नाबाद १५, आदिश शहा १-३) पराभूत वि. व्हेव्ज – २ बाद ६२ (जमीर शेख नाबाद २७, अरुण खट्टर १५, प्रियाग पटेल १-१२). सामनावीर – जमीर शेख
५) वॉरियर्स – ६ षटकांत ३ बाद ८९ (आरव विज ५२, खलीद पारवानी १८, जयदीप पटवर्धन २-१३) वि. वि. कुदो किंग्ज – ६ षटकांत ५ बाद ७३ (अर्जुन शहा ३३, जयदीप पटवर्धन १८, आरव विज २-७). सामनावीर- आरव विज