पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा; टायफून्स, व्हेव्ज, लायन्स, टायगर्स उपांत्य फेरीत

पुणे । टायफून्स, व्हेव्ज, लायन्स, टायगर्स या संघांनी पूना क्लब आयोजित पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.पूना क्लबच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पधेर्तील पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत टायफून्स संघाने ईगल्सवर सहा गडी राखून मात केली.

टायफून्सच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून ईगल्सला ४ बाद ५३ धावांत रोखले. टायफून्सकडून मेहुल राठोडने दोन गडी बाद केले. टायफून्सने विजयी लक्ष्य ५.५ षटकांत ४ गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले. यात वरुण श्रीवास्तवने नाबाद २८ धावांची खेळी केली.

यानंतर दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत व्हेव्ज संघाने आॅल स्टार्स संघावर दहा गडी राखून विजय मिळवला. तिसऱ्या लढतीत लायन्स संघाने मॉव्हरिक्स संघावर तीन धावांनी विजय मिळवला. लायन्स संघाने दिलेल्या ५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मॉव्हरिक्स संघाला ५ बाद ४९ धावाच करता आल्या.

चौथ्या लढतीत टायगर्स संघाने वॉरियर्स संघावर सात गडी राखून विजय मिळवला. वॉरियर्स संघाने आरव विजच्या फटकेबाजीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना ३ बाद ७१ धावा केल्या. टायगर्स संघाने विजयी लक्ष्य पाचव्या षटकात तीन गडींच्या मोबदल्यात सहज साध्य केले.

संक्षिप्त धावफलक :

१) ईगल्स – ६ षटकांत ४ बाद ५३ (उमेश पिल्ले ३१, मेहुल राठोड २-४, अमित रामनानी १-९) पराभूत वि. टायफून्स – ५.५ षटकांत ४ बाद ५७ (वरुण श्रीवास्तव नाबाद २८, चेतन घुवालेवाला १६, आर्यमन पिल्ले २-५, दिव्यांशू सेहगल १-२). सामनावीर -वरूण श्रीवास्तव

२) ऑल स्टार – ६ षटकांत ३ बाद ५४ (रोहित आचार्य १६, अली हाजी १६, राहिल मिरचंदानी नाबाद १०, झमीर शेख १-६, राज बी. १-९, अभय मिश्रा १-११) पराभूत वि. व्हेव्ज – ५ षटकांत बिनबाद ५७ (आदिश शहा नाबाद ३२, अरुण खट्टर नाबाद २५). सामनावीर- आदिश शहा

३) लायन्स – ६ षटकांत ४ बाद ५२ (मिहिर बोरावके नाबाद १४, मनोपाल सेहेम्बे १३, नील हळबे २-१२, यश शहा १-५) वि. वि. मॉव्हरिक्स – ६ षटकांत ५ बाद ४९ (रौनक ढोले-पाटील ३४, मनोपाल सेहेम्बे १-११, तुषार असवानी १-९, अमर शेम्बेय १-१०). सामनावीर – मनोपाल सेहेम्बे

४) वॉरियर्स – ६ षटकांत ३ बाद ७१ (आरव विज ४६, साहिल मिलानी १२, अर्जुन मोताडू १-८, आदर्श हेगडे १-१०, विशाल सेठ १-२२) पराभूत वि. टायगर्स – ५ षटकांत ३ बाद ७२ (आर्यन गाडगीळ २१, अर्जुन मोताडू १६, संदीप अबिचंदानी १३, आदर्श हेगडे नाबाद १२, अखलाक पूनावाला १-११, सुजय शहा १-१४, खलीद परवानी १-१२). सामनावीर – अर्जुन मोताडू

You might also like