पुणे । गोलंदाजांच्या अचूक मा-याच्या जोरावर टायगर्स संघाने पूना क्लबच्या वतीने आयोजित पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत कुदो डीटीपीएल किंग्ज संघावर ९ धावांनी मात केली. टायगर्स संघाने दिलेल्या ६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना किंग्ज संघाला ४ बाद ५७ धावाच करता आल्या.
पूना क्लबच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. बुधवारी झालेल्या लढतीत टायगर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. टायगर्स संघाने ४ बाद ६६ धावा फलकावर लावल्या. टायगर्स संघाकडून आर्यन गाडगीळने १० चेंडूंत दोन षटकार व एक चौकारसह सर्वाधिक २५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल किंग्ज संघाच्या एकालाही फटकेबाजी करता आली नाही आणि त्या संघाला ५७ धावाच करता आल्या.
संक्षिप्त धावफलक : १) टायगर्स – ६ षटकांत ४ बाद ६६ (आर्यन गाडगीळ २५, अर्जुन मोताडू २०, कपिल पंजाबी २-१) वि. वि. कुदो किंग्ज – ६ षटकांत ४ बाद ५७ (ऋषी चैनानी १५, जयदीप पटवर्धन १४, निहाल हेमदेव १-११, संदीप अबिचंदानी १-६).सामनावीर – आर्यन गाडगीळ
२) आॅल स्टार – ६ षटकांत २ बाद ७५ (रोहित आचार्य ३६, रोहित जाधव २४, युवल गुलाटी १-७) वि. वि. वॉरियर्स – ६ षटकांत ३ बाद ६७ (आरव विज ३८, वीर मक्कर नाबाद २०, राहिल मीरचंदानी १-८). सामनावीर – रोहित आचार्य
३) मॉव्हरिक्स – ६ षटकांत ५ बाद ५५ (रौनक ढोले पाटील २५, गौरव खांडवे १०, तुषार असवानी २-४)पराभूत वि. लायन्स – ५.५ षटकांत १ बाद ५६ (किरण देशमुख नाबाद ४०, तुषार असवानी नाबाद ११, यश शहा १-४). सामनावीर – किरण देशमुख
४) जॅग्वार्स – ६ षटकांत ३ बाद ५८ (राजेश बनसोडे नाबाद २०, अक्षय केळकर १८, क्रिश शहा १-५, वरुण श्रीवास्तव १-११) पराभूत वि. टायफून्स – ५.२ षटकांत २ बाद ६० (वरुण श्रीवास्तव नाबाद २९, मेहुल राठोड नाबाद ११, विराज मेहता १-१०). सामनावीर – वरुण श्रीवास्तव