Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रैना-पोलार्ड खेळलेल्या स्पर्धेत मॅच फिक्सिंग? आयसीसीने सुरू केला तपास

रैना-पोलार्ड खेळलेल्या स्पर्धेत मॅच फिक्सिंग? आयसीसीने सुरू केला तपास

January 7, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Suresh raina Kieron Pollard

Photo Courtesy: Twitter/ICC/BCCI


क्रिकेटजगावर पुन्हा एकदा मॅच फिक्सिंगचे सावट येण्याची शक्यता आहे. आयसीसी ऍन्टी करप्शन युनिटने मॅच फिक्सिंग प्रकरणात तपास सुरू केल्याचे समजत आहे. नुकत्याच पार पडलेल्या अबु धाबी टी-10 लीगमध्ये खेळाडूंनी मॅच फिक्स केल्याची शंका उपस्थित केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आयसीसी स्वतः या प्रकरणात लक्ष घालताना दिसत आहे. लीगमध्ये सुरेश रैना, कायरन पोलार्ड, राशिद खान आणि ऑयन मॉर्गन अशा दिग्गजांनी सहभाग नोंदवला असल्यामुळे फिक्गिंगची बाब गंभीर असल्याचे समजते.

23 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर यादरम्यानच्या काळात अबु धाबी टी-10 लीग खेळली गेली. लीगमध्ये एकूण 6 संघ खेळले आणि दोन आठवड्यांमध्ये या संघात एकूण 33 सामने खेळवले गेले. अंतिम सामन्यात डेक्कन ग्लॅडिएटर्स आणि न्यूयॉर्क स्ट्रायकर्स संघ आमने सामने होते. या सामन्यात ग्लॅडिएटर्स संघाने स्ट्रायकर्सला 37 धावांनी मात दिली आणि विजेतेपद पटकावले. ग्लॅडिएटर्सकडून भारताचा सुरेश रैना (Suresh Raina), आंद्रे रसल, निकोलस पूरन आणि स्ट्रायकर्ससाठी कायरन पोलार्ड (Kieron Pollard), राशिद खान (Rashid Khan) आणि ऑयन मॉर्गन असे दिग्गज खेळाडू खेळत होते. पण लीग संपून काहीच दिवस झाले असताना मॅच फिक्सिंगच्या चर्चा सुरू झाल्या.

यूके डेली मेलच्या वृत्तानुसार, आयसीसीचे ऍन्टी करप्शन युनिटला एकूण 10 स्पर्धांमध्ये 12 पेक्षा अधिक मॅच फिक्सिंगची प्रकरणे मिळाली आहेत. आयसीसीचा हा तपास सट्टेबाजीवर केंद्रित असणार आहे. या प्रकरणांमध्ये जवळपास 150 कोटी रुपयांचा सट्टा लागल्याचा अंदाज आहे. लीगमधील सर्व आठ संघांचे स्पॉन्रर्स बेटिंग कंपन्या आहेत. माहितीनुसार फ्रँचायझींचे मालक सामन्याआधीच गोलंदाजी आणि फलंदाजीचा क्रम ठरवत होते. लीगमध्ये काही दिग्गजांना संघातून बाहेरची वाट देखील दाखवली गेली. तर काही सामन्यांमध्ये फलंदाज असे शॉट्स खेळून बाद झाले, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.

वृत्तांनुसार आयसीसी या प्रकणात तपास सुरू करण्याचे कारण असेही आहे की, लाईव्ह सामन्यादरम्यान मैदानात प्रक्षकांची संख्या कमी दिसली, पण सट्टा मात्र मोठ्या प्रमाणात लागला. संघ आणि त्यांच्या मालकांकडे देखील काही संशयास्पद घडामोडी घडल्याते सांगितले जात आहे. आशात आयसीसी या फ्रँचायझी मालिकांच्या भूमिकांवर देखील खास लक्ष देणार आहे. क्रिकेटच्या मैदानात यापूर्वी अनेक मोठ्या खेळाडूंवर मॅच फिक्सिंगचे आरोप लावले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याच्यासह काही इतर खेळाडूंना तुरुंगात जावे लागले होते. तर भारतीय संघाचा विश्वचषकविजेता खेळाडू एस श्रीसंत याने आयपीएलमध्ये केलेल्या फिक्सिंगमुळे त्याच्यावर देखील मोठी कारवाई केली गेली होती.  (Possibility of match fixing in Abu Dhabi T-10 League. ICC has also started an investigation)

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकारा फिट, पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये केले गेले यशस्वी उपचार
INDvSL: तिसऱ्या टी20मधून अर्शदीपचा पत्ता कट! कोणाला मिळणार संधी, पाहा भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन


Next Post
Photo Courtesy: Twitter/ICC

'हा तर गोलंदाजांचा अपमान', रन-आऊट प्रकरणात अश्विनने घेतली ऍडम झम्पाची बाजू, डेविस हसीला सुनावले

Team-India

आता जडेजाची चर्चाही होत नाही! अक्षर पटेलच्या अष्टपैलू प्रदर्शनानंतर माजी दिग्गजाचे मोठे विधान

Hardik Pandya & Shivam mavi

भारतीय दिग्गजाने ठेवले कॅप्टन हार्दिकच्या चुकांवर बोट: म्हणाला, "त्याने स्वतः..."

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143