श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान (SLvsPAK) यांच्यात गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात यजमान संघाचा पहिला डाव २२२ धावांतच संपुष्टात आला. याच्या प्रत्युत्तरात मैदानात उतरलेल्या पाकिस्तान संघाची नवखा फिरकीपटू प्रबत जयसूर्याने दाणादाण उडवली आहे. त्याने याही सामन्यात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करताच त्याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
श्रीलंका संघाला प्रबत जयसूर्या (Ptabath Jayasuriya) याच्या रुपात एक अप्रतिम खेळाडू मिळाला आहे. त्याने वयाच्या ३१व्या वर्षी कसोटीमध्ये पदार्पण केले असून तीन डावांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. क्रिकेटच्या इतिहासात मागील ९७ वर्षात कोणत्याच खेळाडूला जमले नाही ते प्रबतने करून दाखवले आहे.
जयसुर्याने वयाच्या ३१व्या वर्षी पदार्पण करत पहिल्या तीन डावांमध्ये पाच किंवा पाच पेक्षा अधिक विकेट्स घेणारा श्रीलंकेचा पहिला तर जगातील तिसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी अशी कामगिरी १८९३मध्ये इंग्लंडच्या टॉम रिचर्डसन आणि १९२५मध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्लॅरी ग्रिमेट यांनी अशी कामगिरी केली आहे. आता तब्बल ९७ वर्षानंतर कसोटीमध्ये याची पुनरावृत्ती झाली आहे.
आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा दुसराच सामना खेळणाऱ्या जयसूर्याने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध १२ विकेट्स घेण्याची कामगिरी करत उत्तम पदार्पण केले होते. तर पाकिस्तान विरुद्धही त्याने कामगिरीत सातत्य राखत संघाला रोखून धरले.
पाकिस्तानने पहिली विकेट गमावली असता जयसूर्याने पाकिस्तानचा सलामीवीर अब्दुल्लाह शफिकला आणि अजहर अली यांना ३ षटकाच्या फरकाने बाद करत पाकिस्तानला धक्के दिले. त्याने आगा सलमान, मोहम्मद नवाज, शाहीन अफ्रिदी यांच्या विकेट्स घेतल्या आहेत. त्याने २९ षटके टाकाताना ६० धावा देत या विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने ९ षटके निर्धाव टाकली आहेत.
जेव्हा श्रीलंकेची निवड समिती ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यासाठी खेळाडूची निवड करत होती. तेव्हा त्यांच्या डोक्यात प्रबतचा विचार दूरपर्यत नव्हता. मात्र काही खेळाडू कोरोनाच्या विळख्यात आले होते त्यामुळे त्याला संधी मिळाली. या संधीचे सोने केले आहे. तसेच त्याने चार वर्षापूर्वी श्रीलंकेसाठी वनडे सामने खेळले आहेत. दोन वनडे सामन्यात खेळताना त्याच्या पदरी निराशा आली होती. मात्र कसोटीमध्ये तो विशेष गोलंदाजी करत विरोधी संघात अडचणी निर्माण करत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तुमसे ना हो पायेगा!’ शेवटच्या चेंडूवर फ्री हिट मिळूनही बलाढ्य संघाने गमावला सामना
टीम इंडियाचे ‘हे’ स्टार खेळाडू वेतन घेणार ७ कोटी, खेळणार मात्र २१ टक्केच
रोहित की विराट? कोणी गाजवलंय मँचेस्टरचं मैदान, एका क्लिकवर घ्या जाणून