fbpx
Sunday, April 18, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पराभवानंतर खेळाडूंसह संघ मालकिणही भडकली; पहा काय उचलले पाऊल

September 21, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

मुंबई । किंग्ज इलेव्हन पंजाबच्या खेळाडूंनी आणि संघाची सह-मालकिण, बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिने मॅच रेफ्रीकडं तक्रार केली आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान महत्त्वपूर्ण वेळी ऑन फील्ड पंच नितीन मेनन यांनी वादग्रस्त ‘शॉर्ट रन’ दिला होता. त्याविरोधात पंजाबने अपील केले आहे, तर माजी खेळाडूंनी योग्य निकालासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याची मागणी केली.

सामना सुपर ओव्हरवर जाण्यापूर्वी टीव्ही फुटेजमध्ये स्क्वेअर लेग पंच मेननने ख्रिस जॉर्डनला 19 व्या षटकातील तिसर्‍या चेंडूवर ‘शॉर्ट रन’ ठरविले. टीव्ही रीप्लेवरून हे स्पष्ट झाले की, जेव्हा त्याने पहिला रन पूर्ण केला तेव्हा जॉर्डनची बॅट क्रीजच्या आत होती.

प्रीती झिंटा म्हणाली की, ” मी नेहमीच खेळात विजय किंवा पराभवास खेळभावना म्हणून स्वीकारण्यावर विश्वास ठेवते, पण  नियम बदलण्याची गरज आहे. जे काही झाले ते झाले, पण भविष्यात तसे होऊ नये.”

त्याचवेळी पंच म्हणून काम करणार्‍या मेनन यांनी सांगितले की, “जॉर्डनने क्रीज गाठला नाही, म्हणून मयंक अगरवाल आणि पंजाबच्या धावसंख्येत एक धाव जोडली नाही.”

तांत्रिक पुरावे असूनही दिलेल्या निर्णयात बदल केला नाही. अखेरच्या षटकात पंजाबला 13 धावांची आवश्यकता होती. मयांक अगरवालने पहिल्या तीन चेंडूंमध्ये 12 धावा केल्या. पंजाबचा संघ एक धाव मागे होता आणि सामना सुपर ओव्हरवर गेला, ज्यामध्ये दिल्लीने विजय मिळवला.

किंग्ज इलेव्हन पंजाबचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश मेनन यांनी सांगितले की, “आम्ही सामनाधिकार्‍यांकडे अपील केले आहे. माणसाकडून चूक होऊ शकते, परंतु आयपीएलसारख्या जागतिक दर्जाच्या स्पर्धेत त्याला स्थान नाही. ती एक धाव आम्हाला प्लेऑफपासून वंचित ठेवू शकते.”

ते पुढे म्हणाले, “हार म्हणजे हारच असते. हे अन्यायकारक आहे. अशी चूक होण्याची संधी नसते म्हणून नियमांचे पुनरावलोकन केले जाईल, अशी अपेक्षा आहे.”

तथापि, अपीलाचा निकाल संभव नाही, कारण आयपीएल नियम २.१२ (अंपायरचा निर्णय) अंतर्गत हे बदल त्वरित केले, तरच पंच निर्णय बदलू शकतात. तसेच पंचांचा निर्णय अंतिम आहे.

पंचांच्या खराब निर्णयानंतर किंग्स इलेव्हन पंजाबचा माजी प्रशिक्षक वीरेंद्र सेहवाग देखील चांगलाच भडकला आहे. त्यानेही ट्विटरच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली आहे.


Previous Post

२० वर्षीय देवदत्त पडिक्कलने आयपीएलमध्ये पदार्पणातच केले धमाकेदार विक्रम

Next Post

विराटने घेतलेला ‘हा’ निर्णय पाहून दुश्मनही करेल त्याच कौतूक

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@SunRisers
IPL

MIvSRH: फॉर्मात असलेल्या नटराजनला संघाबाहेर ठेवण्यामागचे कारण काय? संघ डायरेक्टरनी दिले उत्तर

April 18, 2021
Photo Courtesy: Screengrab/Hotstar
IPL

क्षेत्ररक्षण करताना ट्रेंट बोल्टचा तोल गेला अन् घडलं असं काही; चाहते म्हणाले, ‘ही फील्डिंग की स्विमिंग’

April 18, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘आमच्यासोबत हे काय घडतंय काहीच कळेना,’ सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार वॉर्नरने व्यक्त केली नाराजी 

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चाहर-बोल्टच्या भेदक माऱ्यापुढे ‘ऑरेंज आर्मी’ गारद; आयपीएलच्या मोठ्या विक्रमात मुंबईकर अव्वलस्थानी

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

सुपर संडे: आज कोहली-मॉर्गन आमने सामने, ‘अशी’ असेल आरसीबी आणि केकेआरची प्लेइंग XI

April 18, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

MIvSRH: रोहितच्या ब्रिगेडचा सलग दुसरा विजय, कर्णधाराने ‘यांना’ ठरवले मॅच विनर

April 18, 2021
Next Post

विराटने घेतलेला 'हा' निर्णय पाहून दुश्मनही करेल त्याच कौतूक

आयपीएल पदार्पणात अर्धशतक करणारे सर्वात युवा ४ फलंदाज

स्पर्धा कोणतीही असो; युवा पड्डीकल करतो धमाका, जाणून घ्या इतिहास

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.