वनडे विश्वचषक 2023 मधील अखेरचा साखळी सामना रविवारी (12 नोव्हेंबर) रोजी खेळला जाईल. बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर यजमान भारत आणि गुणतालिकेत अखेरच्या स्थानी असलेल्या नेदरलँड्स यांच्या दरम्यान हा सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ सलग 9 विजय आपल्या नावे करण्याचा प्रयत्न करेल. तर, दुसरीकडे नेदरलँड्स स्पर्धेत आणखी एक उलटफेर करत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी प्रयत्नशील असेल.
चिन्नास्वामी स्टेडियम येथे होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड आहे. यजमान भारताने आतापर्यंत स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करत सर्व सामने जिंकले आहेत. भारताचे प्रमुख फलंदाज व गोलंदाज दिव्यात योगदान देताना दिसतात. दुसऱ्या बाजूला नेदरलँड्स संघ या स्पर्धेत अनेकांना चकवताना दिसला. त्यांनी दक्षिण आफ्रिका व बांगलादेश यांना नमवले. तर पाकिस्तान व श्रीलंका यांच्याविरुद्ध त्यांनी चांगली लढत दिली. नेदरलँड संघाने हा सामना जिंकल्यास त्यांना 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याची संधी मिळेल.
या मैदानावर मोठ्या धावसंख्या होत असल्याने नाणेफेक जिंकून संघ प्रथम फलंदाजीला प्राधान्य देईल. या मैदानावर भारतीय खेळाडूंना उपांत्य फेरी आधी आपली सर्व तयारी जोखण्याची अखेरची संधी असेल. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
नेदरलँड्स: विक्रमजीत सिंग, वेस्ली बारेसी, मॅक्स ओडाऊड, कॉलिन एकरमन, बास डी लिडे, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), तेजा, वॅन डर मर्व, लोगन वॅन बिक, आर्यन दत्त, पॉल मिकरेन.
(Preview India v Netherlands ODI World Cup Match At Bengaluru)