वनडे विश्वचषक 2023 मध्ये बुधवारी (1 नोव्हेंबर) न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा सामना खेळला जाणार आहे. पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना रंगेल. या सामन्यात विजय मिळवणारा संघ उपांत्य फेरीत आपला एक पाय ठेवेल. त्यामुळे हा सामना उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल.
एमसीए स्टेडियम येथे होणाऱ्या हा सामना गुणतालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड संघाचा पुढील प्रवास सोपा करेल. दक्षिण आफ्रिका संघ सहा सामन्यात पाच विजयासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, न्यूझीलंड संघाने सहापैकी चार सामने आपल्या नावे केले आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघ विजयासह थेट पहिल्या क्रमांकावर विराजमान होत उपांत्य फेरीत दाखल होईल. तर, न्यूझीलंड संघाने विजय मिळवला असता ते उपांत्य फेरीच्या अगदी जवळ असतील.
पुणे येथे होणाऱ्या या सामन्यात मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते. या मैदानावर फलंदाजांना पोषक अशी खेळपट्टी असल्याने दोन्ही संघांचे फटकेबाज आक्रमक खेळ करू शकतात. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल.
उभय संघाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका- क्विंटन डी कॉक, टेंबा बवुमा (कर्णधार), रासी वॅन डर डसेन, ऐडन मार्करम, हेन्रिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जेन्सन, गेराल्ड कोएत्झे, कगिसो रबाडा, तबरेझ शम्सी, केशव महाराज.
न्यूझीलंड- विल यंग, डेवॉन कॉनवे, रचिन रवींद्र, डेरिल मिचेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, जिमी निशाम, मिचेल सॅंटनर, ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री, टीम साऊदी
(Preview South Africa V Newzealand In 2023 ODI World Cup)
हेही वाचा-
भारताच्या माजी खेळाडूने गायले शाहीन आफ्रिदीचे गुणगान, इतर गोलंदाजांविषयी म्हणाला…
‘असे’ 5 खेळाडू, ज्यांच्याकडून वर्ल्डकपमध्ये कुणालाच नव्हती अपेक्षा, पण आपल्या प्रदर्शनाने करतायेत धमाल