भारताच्या इंग्लंड दौऱ्याची मंगळवार, ३ जुलैपासून पहील्या टी-२० सामन्याने सुरवात होत आहे.
ऐन भरात असलेल्या इंग्लंडचे भारतासमोर तगडे आव्हान असणार आहे. यापूर्वी अलिकडील काळात इंग्लंडने टी-२० मध्ये दक्षिण अफ्रीका, वेस्टइंडीज, ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंड विरुद्ध चांगली कामगिरी केली आहे.
इंग्लडने खेळलेल्या गेल्या ९ पैकी ५ सामन्यात विजय मिळवला आहे.
तर दुसरीकडे आयपीएलचा मोसम संपल्यानंतर भारतीय संघाचा हा पहिलाच महत्त्वाचा दौरा आहे. भारताने नुकतेच नवख्या आयर्लंडला टी-२० मालिकेत २-० ने पराभूत केले आहे.
तसेच भारतीय संघ गेल्या २० टी-२० सामन्यांपैकी १५ सामन्यात विजयी ठरला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.
भारताकडून रोहित शर्मा, शिखर धवन, सुरेश रैना केएल राहुल आणि फिरकी जोडी चहल-कुलदीप यादव फार्ममध्ये आहेत.
तर इंग्लंडचे जॉस बटलर, जेसन रॉय, जॉनी बेयस्ट्रो, मोइन अली, आदिल रशिदही गेल्या काही काळपासून चांगली कामगिरी करत आहेत.
भारत-इंग्लंड असे दोन्ही संघ चांगल्या लयीत असल्याने मंगळवार, तीन जुलैपासून सुरू होणारी टी-२० मालिका रंगतदार होणार आहे.
सामन्याची वेळ- सायंकाळी ५:३० वाजता
इंडिया– विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, एमएस धौनी (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, युजवेंद्रा सिंह चहल, कुलदीप यादव, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हार्दिक पांड्या, सिद्धार्थ कौल, उमेश यादव.
इंग्लंड- इयोन मोर्गन (कर्णधार), मोइन अली, जॉनी बेयरस्टो, जैक बॉल, जोस बटलर (विकेटकीपर), सॅम कुरन, टॉम कुरन, एलेक्स हेल्स, क्रिस जॉर्डन, लियाम प्लंकेट, आदिल राशिद, जो रूट, जेसन रॉय, डेविड विली, डेविड मलान.
महत्त्वाच्या बातम्या-
-क्रिकेटला मिळाला पहिला १०० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणार खेळाडू
-क्रिकेटर विनोद कांबळी आणि पत्नीच्या विरोधात एफआयआर दाखल