भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे नुकत्याच पार पडलेल्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात, भारतीय संघाने ऐतिहासीक रीत्या सामना अनिर्णित राखला. भारताच्या या अविश्वसनीय कामगिरीबद्दल संपूर्ण क्रीडा विश्वातून त्यांचे कौतुक केले जात आहे . भारताच्या या अविश्वसनीय कामगिरीत मोलाचा वाटा उचलला तो रविचंद्रन अश्विनने.
अश्विनने सामन्याच्या पाचव्या दिवशी हनुमा विहारी सोबत सहाव्या विकेटसाठी तब्बल दिड सत्र फलंदाजी केली होती. यादरम्यानच ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन अश्विनला मोठ्या प्रमाणात स्लेज करत होता. यावेळी अश्विनची पत्नी प्रीतीने ट्विटरवर अश्विनला एक सल्ला दिला होता, ज्याद्वारे तो पेनकडे दुर्लक्ष करेल.
प्रीती अश्विनने ट्विटरवर लिहिले, “केवळ असं समज की आध्या सकाळी 3 वाजता सतत रडते आहे, त्याकडे तू दुर्लक्ष कर.” अध्या ही अश्विनची छोटी मुलगी असून प्रीतीच्या मते ज्याप्रकारे अध्याच्या रडण्याकडे आपण दुर्लक्ष करतो, त्याप्रमाणे तू पेनच्या स्लेजिंग कडे दुर्लक्ष कर.
https://twitter.com/prithinarayanan/status/1348520134906834944
अश्विनने देखील पेन कडे फारसे लक्ष दिले नाही, व आपला खेळ सुरूच ठेवला. मध्येमध्ये अश्विन देखील पेनला स्लेज करत असताना दिसून येत होता. पण सरतेशेवटी अश्विन व भारतासाठीच सामना आशादायी ठरला व पेन कडून सुटलेल्या झेल मुळेच ऑस्ट्रेलियाला विजयाच्या उंबरठ्यावर येऊनही ड्रॉवर समाधान मानावे लागले. अश्विनने शेवटच्या दिवशी फलंदाजी करताना तब्बल 128 चेंडू खेळून 39 धावा केल्या.
मालिकेतील शेवटचा सामना 15 जानेवारी रोजी ब्रिस्बेन येथे सुरू होणार असून आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय संघाकडून सर्व क्रिकेटप्रेमींना उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
भारतीय संघाची दुखापतग्रस्त प्लेईंग इलेव्हन! तब्बल इतक्या खेळाडूंचा समावेश
दीपक हुड्डा-कृणाल पंड्या प्रकरणावर इरफान पठाणने मांडले मत, म्हणाला