भारतीय क्रिकेटपटू नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतात. आता नुकतेच भारताचे सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ हे दोघे ‘द कपिल शर्मा शो’ मधील उपस्थितीमुळे चर्चेत आले आहेत. सोनी टिव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात शिखर आणि शॉ यांनी हजेरी लावली होती. या दरम्यान त्यांनी अनेक गोष्टींवर खुलासा केला आहे.
सोनी टिव्हीने इंस्टाग्रामवर एपिसोडची एक झलक पोस्ट केली आहे. यामध्ये दिसले की, विनोदी कलाकार कपिल शर्मा शिखर आणि शॉ या दोघांची पायखेची करत आहे. यादरम्यान, तो शॉची मस्करी करताना असेही म्हणतो की, तो एका दिवसासाठी शाळा सोडून येथे आला आहे. तसेच शिखरला तो संघसहकाऱ्यांचे मोजे चोरण्याबद्दलही विचारतो. यावर शिखर म्हणतो की, ‘मी मोजेही मागतो, सपोर्टर पण मागतो.’
यानंतर व्हिडिओत असेही दिसते की, कपिल शर्मा शॉ याला विचारतो की, त्याला गर्लफ्रेंड आहे की नाही. याचे उत्तर शॉ ‘नाही’, असे देतो. पण त्याचवेळी तो त्याची जीभ ओठांवर फिरवतो आणि नेमकी हीच गोष्ट कपिल शर्मा पकडतो आणि त्याला त्याबद्दल प्रश्न विचारतो. त्यावर शिखर आणि शॉ जोरजोरात हसू लागतात.
दरम्यान, कपिल शर्मा या दोघांना असाही प्रश्न विचारतो की, त्यांनी कधी विरोधी संघाचे रणनीती ऐकण्याचा प्रयत्न केला आहे का? यावर शॉ हसून उत्तर देतो की, ‘असा प्रयत्न मी एकदा केला होता, पण त्याप्रयत्नात तो एकदा गार्ड विसरला होता.’ तसेच या शोमध्ये शिखर आणि शॉ एक मजेशीर गेमही खेळतात.
शॉ रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा
पृथ्वी शॉ अभिनेत्री प्राची सिंग हिच्यासह रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून होत आहेत. ते दोघेही अनेकदा एकमेकांच्या इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट करताना दिसून आले आहेत. तसेच आयपीएल दरम्यान प्राची दिल्ली कॅपिटल्सचा सामना झाल्यानंतर पृथ्वी शॉचा फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत होती.
शॉ संघाबाहेर
पृथ्वी शॉ सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. त्याला संघात पुनरागमन करण्यासाठी आता देशांतर्गत स्पर्धा आणि आयपीएलमध्ये प्रभावी कामगिरी करावी लागणार आहे. शिखरच्या बाबतीत बोलायचे झाल्यास त्याने भारताच्या वनडे संघात पुनरागमन केले असून तो सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत ७९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. मात्र, हा सामना भारताला ३१ धावांनी पराभूत व्हावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीच्या शिष्याला क्विंटन डी कॉकने ‘धोनी स्टाईल’मध्ये धाडले माघारी, पाहा व्हिडिओ
स्मृती मंधाना | एकट्या पोरीने राखली १४० कोटी भारतीयांची लाज; विराट, रोहित सगळेच झिरो
फलंदाजांनी ठोकले अन् गोलंदाजांनी रोखले! १९ वर्षांखालील विश्वचषकात भारताचा आर्यलंडवर दणदणीत विजय