इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना १८८ धावांचा डोंगर उभा केला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाकडून युवा पृथ्वी शॉ याने आक्रमक अर्धशतकी खेळी केली होती. या खेळी सोबतच त्याने आयपीएल इतिहासात आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
या सामन्यात दिल्ली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात १८९ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. युवा पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी संघाला आक्रमक सुरुवात करून दिली होती. शिखर धवन याने ५४ चेंडूत ८५ धावांची खेळी केली तर पृथ्वी शॉ याने अवघ्या ३८ चेंडूत ७२ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ९ चौकार आणि ३ षटकार लगावले.
यासोबतच त्याने आयपीएलमध्ये वयवर्ष २२ पूर्ण होण्यापूर्वी सर्वाधिक वेळेस ५० किंवा अधिक धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शुबमन गिलची बरोबरी केली आहे. या दोघांनीही वयाची २२ वर्षे पूर्ण करण्याआधी आयपीएलमध्ये प्रत्येकी ७ वेळेस ५० किंवा पेक्षा अधिक धावांची खेळी केल्या आहेत. या यादीत सर्वोच्च स्थानी रिषभ पंत आहे. पंतने १२ वेळेस हा कारनामा केला आहे.
वयवर्ष २२ होण्यापूर्वी आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळेस ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारे फलंदाज
रिषभ पंत : १२
पृथ्वी शॉ : ७
शुबमन गिल : ७
दिल्लीचा विजय
चेन्नई सुपर किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना १८८ धावांचा डोंगर उभा केला होता. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या सलामी फलंदाजांना काही सूर गवसला नाही. फाफ डू प्लेसिस भोपळा ही न फोडता माघारी परतला तर ऋतुराज गायकवाडने अवघ्या ५ धावा केल्या. तसेच सुरेश रैना याने ताबडतोड ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. यासोबतच मोईन अली याने ३६ तर रायुडू ने २३ आणि जडेजाने २६ धावांची खेळी केली.यासोबतच करनने शेवटी येऊन ३४ धावांची आक्रमक खेळी केली.
दिल्लीकडून ख्रिस वोक्स आणि आवेश खानने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच टॉम करन आणि आर अश्विनने प्रत्येकी १ विकेट घेतली.
त्यानंतर १८९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शॉ आणि शिखर धवन यांनी १३८ धावांची सलामी भागीदारी रचली. त्यांच्या या भागीदारीनंतर रिषभ पंतने नाबाद १५ आणि मार्कस स्टॉयनिसने १४ धावा करत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक २ आणि ड्वेन ब्रावोने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
लईच वाईट!! पहिल्याच सामन्यात एमएस धोनी क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ
IPL2021: पृथ्वी शॉ आणि शिखर धवनची वादळी अर्धशतके; दिल्लीचा चेन्नईवर ७ विकेट्सने दणदणीत विजय
किती ते दुर्दैव! रैनाची अर्धशतकी तुफानी खेळी अशा पद्धतीने आली संपुष्टात, पाहा व्हिडिओ