भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेचा थरार सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. वरिष्ठ संघातील खेळाडू इंग्लंडमध्ये असल्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व शिखर धवनच्या हाती देण्यात आले आहे. तसेच या संघात अनेक असे खेळाडू आहेत, जे चांगली कामगिरी करून सर्वांचेच लक्ष वेधून घेण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. तसेच भारतीय संघात असा एक फलंदाज देखील आहे, जो आगामी वनडे मालिकेतील दुहेरी शतक झळकावू शकतो. कोण आहे तो फलंदाज? चला जाणून घेऊया.
पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाकडून शिखर धवन आणि पृथ्वी शॉ डावाची सुरुवात करू शकतात. या मालिकेत पृथ्वी शॉकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. कारण ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये पृथ्वी शॉने अप्रतिम कामगिरी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो चांगल्याच फॉर्ममध्ये देखील आहे. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्याने ८ सामन्यात ८२७ धावा केल्या होत्या. यात त्याने दुहेरी शतक देखील झळकावले होते. (Prithvi shaw can smash double century in in Colombo)
पृथ्वी शॉ ठोकणार दुहेरी शतक?
पृथ्वी शॉ ज्याप्रकारच्या फॉर्ममध्ये आहे ते पाहून असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, तो आगामी वनडे मालिकेत दुहेरी शतक झळकावेल. यामागील मुख्य कारण म्हणजे, श्रीलंका संघात ज्या गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे, त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा जास्त अनुभव नाही. तसेच कोलंबोची खेळपट्टी फलंदाजी करण्यासाठी अनुकूल आहे. जर पृथ्वी शॉने सुरुवातीची १० षटके खेळून काढली तर तो श्रीलंका संघातील गोलंदाजांना अडचणीत टाकू शकतो. यापूर्वी मुंबईकर रोहित शर्माने देखील श्रीलंका संघाविरुद्ध दुहेरी शतक झळकावले आहे.
पृथ्वी शॉला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत संधी देण्यात आली होती. परंतु या मालिकेतील पहिल्या सामन्यात तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. त्यामुळे त्याला संघातून बाहेर काढण्यात होते. तसेच त्याच्या खेळण्याच्या शैलीवरही प्रश्न उपस्थित केले गेले होते. त्यानंतर त्याने कामगिरीत सुधारणा करत उल्लेखनीय कामगिरी केली होती. आपल्या नेतृत्वाखाली त्याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मुंबई संघाला विजय मिळवून दिला होता. या स्पर्धेत त्याने ८ सामने खेळले होते, ज्यामध्ये त्याने १६५.४० च्या सरासरीने ८२७ धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने ३ शतक आणि १ दुहेरी शतक झळकावले होते.
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंका वि. भारत: युझवेंद्र चहलकडे विकेट्सचा ‘शतकवी’र बनण्याची संधी, ‘या’ दिग्गजांवर ठरेल वरचढ
विराट अन् अनुष्काचे खट्याळ रुप कॅमेरात कैद, लंडनच्या गल्ल्यांमध्ये दिसले मस्ती करताना
SLvIND: माजी क्रिकेटरची मागणी; ३४ सामन्यात ११८ विकेट्स घेणाऱ्या ‘त्या’ जोडीला एकत्र खेळवा