गुरुवारी (२९ एप्रिल) झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमने सामने होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून पृथ्वी शॉने तुफान फटकेबाजी केली. त्याने एकाच षटकात ६ चौकार लगावले होते. याच कामगिरीच्या जोरावर त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. हा सामना झाल्यानंतर त्याची प्रेयसी त्याच्या खेळीवर फिदा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर करत त्याची प्रशंसा केली आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघासमोर १५५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करत असताना पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. धवन ४६ धावा करत बाद झाला तर, पृथ्वी शॉने अवघा ४१ चेंडूत ८२ धावांची खेळी केली होती. यात त्याने ११ चौकार आणि ३ षटकार लगावले होते. तसेच त्याने शिवम मावीच्या पहिल्याच षटकात ६ चेंडूत ६ चौकार लगावले होते. या तुफानी खेळीच्या बळावर त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
सामना झाल्यानंतर त्याची प्रेयसी प्राची सिंग हिने पृथ्वी शॉचे तोंडभरून कौतुक केल्याचे पाहायला मिळाले आहे. तिने पृथ्वी शॉचे सामन्यानंतरचे फोटोज् आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत लिहिले की, ‘मला तुझा अभिमान आहे.’ तर दुसऱ्या फोटोवर तिने कॅप्शन म्हणून लिहिले की, ‘इतके पुरस्कार ठेवण्यासाठी आता नवीन सुटकेसची आवश्यकता भासेल.’
प्राची सिंग ही नेहमी पृथ्वी शॉचे फोटोज् आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत त्याला समर्थन करत असते.
#Shaw pic.twitter.com/EEmBpPPX8Q
— Vishal Kumar (@VishalSports123) April 29, 2021
सामना झाल्यानंतर पृथ्वी शॉ म्हणाला..
सामना झाल्यानंतर आपल्या खेळीबद्दल पृथ्वी शॉ म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगू तर, मी फलंदाजी करताना कसलाच विचार करत नव्हतो. फक्त योग्य चेंडूची वाट पाहत होतो. आम्ही (शिवम मावी सोबत) एकमेकांविरुद्ध गेल्या ४ ते ५ वर्षांपासून खेळत आहोत. त्यामुळे मला अंदाज होता की, तो कुठे गोलंदाजी करेल. मी आधीच तयार होतो. पहिले चार-पाच चेंडू फेकले गेले ते अर्ध्या खेळपट्टीवर होते. मी शॉर्ट बॉलसाठी सज्ज होतो, पण दुर्दैवाने तो तेथे गोलंदाजी करु शकला नाही. ”
कोण आहे प्राची सिंग?
गेल्या काही महिन्यांपासून पृथ्वी शॉ, प्राची सिंगला डेट करत असल्याच्या बातम्यांना उधाण येत आहे. प्राची सिंह ही देखील अभिनय क्षेत्रात नवीनच आहे. तिने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात कलर्स टिव्ही शो मध्ये येणाऱ्या ‘उडान’ या मालिकेतून केली होती. तिने या मालिकेत वांशिका शर्माची भूमिका साकारली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
कृणालची एक अशीही बाजू! संघ सहकाऱ्याला दिली न शोभणारी वागणूक, सर्वत्र रंगली एकच चर्चा