भारताचा युवा प्रतिभावंत खेळाडू पृथ्वी शॉने सन 2018 मध्ये झालेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. त्याचा नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वविजेताही बनला होता. त्याच्या या कामगिरीमुळे केवळ चाहत्यांनाच नाही, तर क्रिकेटमधील दिग्गजांनाही त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. नोव्हेंबर 2020 मध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही त्याची भारतीय कसोटी संघात निवडही झाली आहे. मात्र, आयपीएलमध्ये त्याने त्याच्या फलंदाजीने सर्वांनाच निराश केले आहे. आता समालोचक आकाश चोप्राने या दौऱ्याच्या आधी त्याच्या खराब फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
आकाश चोप्राने व्यक्त केली चिंता
माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने ट्विट केले की, “पृथ्वीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यांमध्ये सलामीला यावे लागेल. पहिला कसोटी सामना दिवस-रात्र असल्याने विद्यूत प्रकाशझोतात खेळला जाईल. मला माहित आहे की आयपीएलच्या कामगिरीवरून आपण त्याची चाचणी करू शकत नाही. परंतु तरीही बॅट आणि चेंडूमधील खेळ आहे . मी खरोखर आशा करतो की तो फॉर्ममध्ये परत येईल”
Prithvi has to open for India in Tests in Australia. First match is under lights with the pink ball. I know IPL is not tests. Different formats and all. But it’s still bat vs ball. I really hope and pray that he finds form…… 🤞🤞
— Aakash Chopra (@cricketaakash) November 2, 2020
पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक वेळा बाद होण्याऱ्या फलंदाजांच्या यादीत पृथ्वी अव्वल स्थानी
आयपीएलमध्ये सोमवारी (2 ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ अवघ्या 4 धावा करून पॉवरप्लेच्या षटकांमध्येच बाद झाला. आयपीएलच्या 13 व्या हंगामात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक वेळा बाद होण्याच्या यादीत तो अव्वल स्थानी आहे. तो 09 वेळा पॉवरप्लेच्या षटकांमध्ये बाद झाला आहे.
पॉवरप्लेमध्ये सर्वाधिकवेळा बाद होणाऱ्या फलंदाजांची यादी:
पृथ्वी शॉ – 9 वेळा
डु प्लेसिस -7 वेळा
स्टीव्ह स्मिथ – 7 वेळा
डी कॉक – 6 वेळा
शिखर धवन, -6 वेळा
नितीश राणा – 6 वेळा
राहुल त्रिपाठी – 6 वेळा
आयपीएल 2020 मधील मागील 6 सामन्यातील पृथ्वीची कामगिरी
मागील सहा सामन्यात पृथ्वी शॉला फक्त एकदाच दुहेरी धावसंख्या गाठण्यात यश आले आहे.
मागील साहा सामन्यात पृथ्वी शॉ याने केलेल्या धावा :
4 धावा (3 चेंडू ) वि. मुंबई इंडियन्स
0 धावा (1 चेंडू ) वि. राजस्थान रॉयल्स
0 धावा (2 चेंडू) वि. चेन्नई सुपर किंग्ज
7 धावा (11 चेंडू ) वि. किंग्ज इलेव्हन पंजाब
10 धावा (11 चेंडू ) वि. मुंबई इंडियन्स
9 धावा (6 चेंडू ) वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
महत्त्वाच्या बातम्या –
बापरे! बीसीसीआयवर कॉपीराईटचा आरोप, झाली मोठी कारवाई
“पराभूत होऊनही क्वालिफाय होणाऱ्याला RCB म्हणतात “, प्ले ऑफमध्ये स्थान मिळवल्यानंतर मीम्स व्हायरल
आयपीएलनंतर आता फाफ डू प्लेसिस करणार ‘या’ मोठ्या स्पर्धेत पदार्पण; पोलार्डची घेणार जागा
ट्रेंडिंग लेख –
IPL – धोनी पुढील हंगाम खेळणार, परंतु ‘हे’ खेळाडू होऊ शकतात चेन्नई संघातून बाहेर
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?