इंडियन प्रिमियर लीगमध्ये (आयपीएल) दिल्ली डेअरडेविल्स हा एकमेव असा संघ आहे, जो आतापर्यंत एकदाही अंतिम सामन्यात पोहोचलेला नाही. तसेच, त्यांना बाद फेरीत जाण्यातही यश मिळाले.
काही वर्षांच्या खराब प्रदर्शनानंतर अखेर २०१९मध्ये दिल्ली डेअरडेविल्सला (Delhi Daredevils) एका नव्या रुपात पाहायला मिळाले. त्यांनी संघाचे नाव बदलून दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) ठेवले. पुढे नावाबरोबरच त्यांच्या प्रगतीही झाले. याला कुठे ना कुठे कारणीभूत होता दिल्लीचा रहिवासी शिखर धवन (Shikhar Dhawan).
धवनने आयपीएल कारकिर्दीतील ६ वर्षे (२०१३-२०१८) सनरायजर्स हैद्राबादसोबत घालवल्यानंतर, २०१९मध्ये दिल्ली कॅपिटल्समध्ये प्रवेश केला होता. संघात येताच धवनने भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉसह सलामीला फलंदाजी करत आपला प्रभाव पाडण्यास सुरुवात केली. त्यांच्या जोडीने संघासाठी अनेक विजयांचा पाया रचला.
दिल्ली कॅपिटल्सच्या इंस्टाग्रामवरील लाईव्ह सेशनदरम्यान शॉला त्याचा आवडता सलामीवीर जोडीदार कोण आहे असे विचारण्यात आले होते. यावर उत्तर देत, शॉने शिखर धवनचे नाव घेतले. तो म्हणाला, धवन माझा आवडता सलामीवीर जोडीदार (Opener Partner) आहे कारण मी त्याच्यासोबत खूप वेळा सलामीला फलंदाजी केली आहे.
शॉने फिरोज शाह कोटला स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (Kolkata Knight Riders) फक्त ५५ चेंडूत ९९ धावा केल्या होत्या. त्याच्या या प्रयत्नाने सामना अनिर्णित राहिला. पण, दिल्ली कॅपिटल्सने शेवटी सुपर ओव्हरमध्ये तो सामना जिंकला.
२०२०च्या सुरुवातीला पार पडलेल्या न्यूजीलंड दौऱ्यावर मर्यादित षटकांच्या सामन्यात शॉला सलामीला खेळण्याची संधी मिळाली होती.
सध्या जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे गेल्या काही आठवड्यांपासून भारतात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आयपीएल इतिहासात अनसोल्ड राहिलेले ३ महान भारतीय क्रिकेटपटू
-भारताबरोबर एशेससारखीच कसोटी मालिका होणार, हा देश होणार सहभागी?
-पृथ्वी शाॅचा मोठा खुलासा, कोच करत होते चुकीचे मार्गदर्शन; या खेळाडूमुळे झाले करियर