भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज प्रिया पुनियाकडे भारतीय संघाचं भविष्य म्हणून पाहिलं जातं. तिने नुकतेच संघात आपले स्थान बनवले आहे. तिने नुकतेच इंस्टाग्राम सेशन केले. त्यात तिला चाहत्याने मजेशीर प्रश्न विचारला. त्यावर तिने जे प्रत्युत्तर दिले त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
बॉयफ्रेंडच्या प्रश्नावर प्रियाने दिली अजब प्रतिक्रिया
राजस्थानची २४ वर्षीय फलंदाज प्रिया पुनियाला एका चाहत्याने तिच्या बॉयफ्रेंडबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नावर प्रियाने कोणतेही उत्तर दिले नाही. परंतु तिने अजब रिऍक्शन दिली. तिची ही रिऍक्शन सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
https://twitter.com/pant_fc/status/1329356583193649152
क्रिकेटपटू नसती तर बनली असती बॅडमिंटनपटू
बॉयफ्रेंडबद्दल तिने काही सांगितले नाही. परंतु तिने आपल्या चाहत्यांना सांगितले की, ती क्रिकेटपटू नसती, तर ती नक्कीच बॅडमिंटनपटू बनली असती. सोबतच तिने आपल्या आवडत्या राजधानी डिशबद्दल बोलताना चूरमा लाडू खूप आवडत असल्याचे सांगितले.
प्रिया पुनियाची कारकीर्द
प्रियाने आतापर्यंत भारतीय महिला संघाकडून ५ वनडे आणि ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात तिने ४३.७५ च्या सरासरीने १७५ धावा केल्या आहेत. सोबतच टी२०त तिने केवळ ९ धावा केल्या आहेत.
याव्यतिरिक्त तिने नुकतेच महिला टी२० चॅलेंजमध्ये सुपरनोव्हासकडून २ सामने खेळताना ४१ धावा केल्या होत्या. मागील काही काळापासून ती फॉर्ममध्ये नाही. मागील ९ डावांमध्ये तिला एकही अर्धशतक ठोकता आले नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
केएल राहुलने स्वीकारावी चुकीच्या संघनिवडीची जबाबदारी; माजी दिग्गजाचे रोखठोक मत
जबरदस्त फिरकीपटू लामिछाने खेळणार मिलरसोबत; बिग बॅशमधील ‘या’ संघाशी झाला करार
“सांगा किती राशिद?”, राशिद खानने चाहत्यांना टाकलं कोड्यात
ट्रेंडिंग लेख-
…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात
हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश
पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी