fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

कोहलीच्या कोचकडून ७ वर्ष ट्रेनिंग घेतलेली खेळाडू आता टीम इंडियात

शुक्रवारी(21 डिसेंबर) भारतीय महिला संघाची न्यूझीलंड दौऱ्यातील मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी घोषणा करण्यात आली आहे. न्यूझीलंड दौऱ्यातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी प्रिया पूनिया हिची देखील निवड झाली आहे.

विशेष म्हणजे प्रियाने 2008 ते 2015 या 7 वर्षात विराट कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांच्याकडूनच मार्गदर्शन घेतले आहे. तिचे वडील सध्या जयपूरमध्ये  भारतीय सर्वेक्षण विभागात मुख्य क्लार्क आहेत. पण प्रिया दिल्लीकडून क्रिकेट खेळली आहे. कारण तिचे वडील आधी दिल्लीमध्ये होते.

तिने नुकतेच बंगळूरुमध्ये सीनियर महिला वनडे चॅम्पियनशिपमध्ये दिल्लीकडून खेळताना 2 शतके केली आहेत. ही शतके तिने तमिळनाडू आणि गुजरात विरुद्ध केली आहेत. तिने 8 सामन्यात 50 च्या सरासरीने 407 धावा केल्या आहेत. तिच्या या कामगिरी नंतर तिची भारताच्या टी20 संघात निवड झाली आहे.

तिला भारताची अनुभवी फलंदाज वेदा कृष्णमुर्तीच्या ऐवजी न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या टी20 संघात घेण्यात आले आहे.

प्रिया सुरुवातीला बॅडमिंटन खेळत होती. नंतर तिने वयाच्या 9 व्या वर्षी सुराणा अकादमीत  क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पण त्यानंतर 6 महिन्यातच तिचे कुटुंब दिल्लीला स्थायिक झाले. त्यामुळे तिने राजकुमार शर्मा यांच्या वेस्ट दिल्ली अकादमीमध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

तिने दिल्लीकडून 19 वर्षांखालील, 23 वर्षांखालील आणि वरिष्ठ स्तरावरील क्रिकेट खेळले आहे. ती सध्या जयपूरमध्ये राहत असून तिथेच क्रिकेटचा सराव करते. तिच्या वडीलांनी तिचा भाऊ राहुलही क्रिकेट खेळत असल्याने दोघांसाठी जयपूरमध्येच स्वत:चे मैदान तयार केले आहे.

त्यामुळे ते दोघे बहिण भाऊ त्या मैदानावर सराव करतात. जेव्हाही क्रिकेटचे सामने असतात तेव्हा प्रिया दिल्लीला जाते. तिच्या वडीलांनी विद्यापीठाच्या स्तरावर क्रिकेट आणि बॅडमिंटन खेळले आहे.

याबरोबरच 22 वर्षीय प्रियाचे 2 वेळा भारताच्या कॅम्पमध्येही निवड झाली आहे. 2015 मध्ये भारत अ संघाकडून तिने भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड संघाविरुद्ध 42 धावा केल्या होत्या.

असा आहे भारतीय महिला संघाचा वनडे संघ-

मिताली राज(कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्म्रीती मानधना, पुनम राऊत, दीप्ति शर्मा, दयालन हेमालता, जेमिमा रॉड्रिगेज, मोना मेश्राम, तानिया भाटिया, एकता बिष्त, पूनम यादव, राजेश्वरीगायकवाड, झुलन गोस्वामी, मानसी जोशी, शिखा पांडे

असा आहे भारतीय महिला संघाचा टी20 संघ- 

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्म्रीती मानधना, (उपकर्णधार), मिताली राज, जेमिमा रॉड्रिगेज, दीप्ति शर्मा, तानिया भाटिया, पूनम यादव, राधा यादव, अनुजा पाटील, एकता बिष्त, दयालन हेमालता, मानसी जोशी, अरुंधती रेड्डी, प्रिया पूनिया, शिखा पांडे.

महत्त्वाच्या बातम्या:

योगाचार्य होण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू सोडणार होता क्रिकेट

या व्यक्तीच ऐकलं तर अश्विन येऊ शकतो तिसऱ्या कसोटीत ओपनिंगला

मेस्सी-रोनाल्डो यांच्यात २०१८ मध्ये सर्वाधिक गोल करण्यासाठी चुरस

You might also like