इंडियन प्रीमियर लीग २०२०चा चौदावा सामना शुक्रवारी (२ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे झालेला हा सामना दोन्ही संघांचा या हंगामातील चौथा सामना होता. दरम्यान हैदराबाद संघाचे युवा खेळाडू प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मा यांनी एक दमदार विक्रम केला आहे.
झाले असे की, हैदराबाद संघाचा कर्णधार डेविड वॉर्नरने नाणेफेक जिंकत सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ विकेट्स गमावत १६४ धावा केल्या. दरम्यान पहिल्याच षटकात यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टोची विकेट गेल्यामुळे संघाला मोठा धक्का बसला.
पण पुढे सलामीला फलंदाजीसाठी आलेला वॉर्नर आणि मनिष पांडेने संघाला डाव सावरला. पण ११व्या षटकापर्यंत हे दोन्ही धुरंधर पव्हेलियनला परतले. तर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला केन विलियम्सनदेखील ९ धावा करत बाद झाला. त्यामुळे हैदराबाद संघाची चिंता वाढली होती.
मात्र ५व्या आणि ६व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या प्रियम गर्ग व अभिषेक शर्माने दमदार फलंदाजी प्रदर्शन केले. या दोन्ही युवा खेळाडूंनी ७७ धावांची दमदार भागिदारी रचली. यात १९ वर्षीय गर्गच्या ४२ धावांचा आणि २० वर्षीय अभिषेकच्या ३१ धावा समावेश होता. यासह गर्ग आणि अभिषेकची जोडी ही आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावांची भागिदारी करणारी २० किंवा त्यापेक्षा कमी वर्षांखालील पहिलीच फलंदाजी जोडी ठरली आहे.
त्यांच्यापुर्वी विराट कोहली आणि मनिष पांडेने २००९ साली दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात हा पराक्रम केला होता. पण त्यावेळी त्यांनी मिळून फक्त ३६ धावांची भागिदारी रचली होती.
एवढेच नव्हे तर, सर्वात कमी एकत्रित वयात ५०पेक्षा जास्त धावांची भागिदारी करणारे ही अव्वल क्रमांकाची जोडी ठरली आहे. दोघांचे मिळून वय केवळ ३९ वर्षे ३३५ दिवसांचे असताना गर्ग आणि अभिषेकनी मिळून ७७ धावा ठोकल्या आहेत. या यादीत संजू सॅमसन आणि रिषभ पंत यांची जोडी दूसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी २०१७ साली हैदराबादविरुद्ध ४० वर्षे ३९ दिवसांच्या वयात ७२ धावांची भागिदारी केली होती. तर ट्रॅविस हेड आणि सर्फराज खान यांनी मिळून मुंबई इंडियन्सविरुद्ध हा पराक्रम केला होता.
२० किंवा त्यापेक्षा कमी वय असणाऱ्या फलंदाजांची सर्वोच्च भागिदारी
प्रियम गर्ग व अभिषेक शर्मा- ७७ धावा विरुद्ध चेन्नई २०२०
विराट कोहली व मनिष पांडे- ३६ धावा विरुद्ध दिल्ली २००९
सर्वात कमी एकत्रित वयात ५० पेक्षा जास्त धावांची भागिदारी
३९ वर्षे ३३५ दिवस- अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग (७७ धावा, विरुद्ध चेन्नई २०२०)
४० वर्षे ३९ दिवस- संजू सॅमसन, रिषभ पंत (७२ धावा, विरुद्ध हैदराबाद २०१६)
४० वर्षे २८९ दिवस- ट्रॅविस हेड, सर्फराज खान (६३ धावा ,विरुद्ध मुंबई इंडियन्स २०१६)
२० किंवा त्यापेक्षा कमी वय असाताना एका संघाकडून ३०पेक्षा जास्त धावा करणारे दोन फलंदाज
मनन वोहरा (४२) व अक्षर पटेल (४२), पंजाब विरुद्ध दिल्ली २०१४
रिषभ पंत (६९) व पृथ्वी शॉ (४७), दिल्ली विरुद्ध राजस्थान २०१८
रिषभ पंत (६१) व अभिषेक शर्मा (४६), दिल्ली विरुद्ध बेंगलोर २०१८
प्रियम गर्ग व अभिषेक शर्मा, हैदराबाद विरुद्ध चेन्नई २०२०
https://twitter.com/chaitu_20/status/1312063989950504960
महत्त्वाच्या बातम्या-
व्वा रे पठ्ठ्या! पुनरागमन करताच ब्राव्होने केला ‘हा’ कारनामा; ठरला चौथा परदेशी खेळाडू
रायडूची चपळाई आणि धोनीचा धुर्तपणा असल्यावर ‘रनआऊट’ तर फिक्स ना भाऊ! पाहा व्हिडिओ
सुपरमॅनचा सुपर कॅच! डुप्लेसीने घेतलेला झेल पाहून हैदराबादचं डगआऊटही झालं वेडं
ट्रेंडिंग लेख-
‘बिग टॉम’ बिरुदावली लाभलेले टॉम मूडी म्हणजे ‘दर्जेदार खेळाडू आणि असामान्य प्रशिक्षक’
गळ्यात २५ तोळ्याची सोन्याची चैन घालून गोलंदाजी करणारा भारताचा प्रविण कुमार
‘या’ तीन कारणांमुळे किंग्ज इलेव्हन पंजाबला पाहावे लागले पराभवाचे तोंड