बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ६१ वा सामना गतविजेता बंगाल वॉरियर्स व तेलगू टायटन्स यांच्या दरम्यान खेळला गेला. दिवसातील पहिला सामना ज्याप्रकारे उच्च गुणांचा झाला. त्याच्या अगदी उलट हा सामना खेळला गेला. कमी गुणांच्या या अटीतटीच्या सामन्यात अखेरीस २७-२८ असा विजय मिळवला.
स्पर्धेतील पहिला विजय शोधत असलेल्या तेलगू संघाने आणि पुढे बंगालविरुद्ध चांगली सुरुवात केली. रजनीश व अंकित या दोन्ही रेडरने एकेक गुण घेत संघासाठी गुण मिळवले. बंगालसाठी मनिंदर व सुकेश हेगडे ही अनुभवी जोडी गुण घेत होती. पहिल्या हाफच्या अखेरीस बंगाल १४-१३ अशांना मात्र आघाडीवर होता.
दुसऱ्या हाफमध्ये ही काट्याची लढत कायम राहिली. मात्र, रजनीशने तेलगू संघाला आघाडीवर नेले. तेलुगु बराच वेळ एकेरी-दुहेरी गुणांच्या आघाडीसह सामन्यात तग धरून होते. मात्र, सामना संपण्यास दोन मिनिटे शिल्लक असताना बंगालने तेलगू संघाला ऑल आउट करत तीन गुणांची महत्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर बंगालने तांत्रिकदृष्ट्या व संयमाने सामन्यात आपण पराभूत होणार नाही याची काळजी घेतली नाही.