प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात रविवारी (६ फेब्रुवारी) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात पटना पायरेट्सने बंगाल वारी असला पराभूत करत गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले. तर, दिवसातील दुसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्सने पवन सेहरावतच्या बेंगलोर बुल्सला पटखनी देत नवव्या क्रमांकावर झेप घेतली.
दिवसातील पहिल्या सामन्यात मनिंदर सिंगच्या नेतृत्वातील बंगाल संघाला पटनाने एकहाती पराभूत केले. सामन्याची सुरुवात संघर्षपूर्ण झाली तरी, नंतर सामना एकतर्फी झाला. सचिन, गुमानसिंग व शादलू यांनी अनुक्रमे ११, ७ व ५ गुण घेत पटना च्या विजयात मोठा वाटा उचलला. पूर्ण वेळेनंतर बंगाल संघ २९-३८ असा मागे राहिला. यासह पटनाने गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले.
दिवसातील दुसऱ्या सामन्यात ११ व्या क्रमांकावरील गुजरात व तिसऱ्या क्रमांकावरील बेंगलोर हे संघ समोरासमोर होते. पूर्ण वेळेतील तब्बल ३० मिनीटे सामना चुरशीचा सुरू होता. मात्र, बेंगलोर संघाने काही टाळता येण्यासारखा चुका केल्याने त्यांना ऑल आऊट व्हावे लागले. अखेरचे चार मिनिटे शिल्लक असताना गुजरातकडे ५ गुणांची आघाडी घेतली होती. मात्र, बंगालने पुन्हा पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. अखेरचा दीड मिनिटात गुजरातला ऑल-आऊट झाल्याने बेंगलोरने बरोबरी साधली. मात्र, बेंगलोरने पुन्हा धसमुसळा खेळ केल्याने गुजरातने ४०-३६ असा विजय मिळवला.