Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात पुरस्कार विजेत्यांवर पैशांचा पाऊस, पाहा कोणत्या खेळाडूंना मिळाले पुरस्कार

प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात पुरस्कार विजेत्यांवर पैशांचा पाऊस, पाहा कोणत्या खेळाडूंना मिळाले पुरस्कार

February 26, 2022
in कबड्डी, टॉप बातम्या
Naveen-Kumar

Photo Courtesy: Twitter/ProKabaddi


बंगळुरू। शुक्रवारी (२५ फेब्रुवारी) दबंग दिल्ली संघाने प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाचे (Pro Kabaddi 8) विजेतेपद पटकावले. याबरोबरच या हंगामाची सांगता झाली. दबंग दिल्लीने (Dabang Delhi K.C) अंतिम सामन्यात तीन वेळचे विजेते पटना पायरेट्सचा (Patna Pirates) ३७-३६ अशा फरकाने पराभव केला आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले. दबंग दिल्लीसाठी प्रो कबड्डीचे हे पहिलेच विजेतेपद ठरले. 

दिल्लीला विजेतेपद मिळाल्याबद्दल ३ कोटी रुपये बक्षीस रक्कम देण्यात आली. तसेच उपविजेते ठरलेल्या पटना पायरेट्सला १.८० कोटी रुपये बक्षीस मिळाले.

दिल्लीकडून नवीन कुमार आणि विजय मलिकने सुपर १० पुर्ण करत विजयात मोलाचा वाटा उचलला. विजयने १४ आणि नवीनने १३ गुण अंतिम सामन्यात मिळवले. त्यामुळे या सामन्यातील जवळपास सर्वच पुरस्कार या दोघांच्या नावावर राहिले. या लेखातून आपण अंतिम सामन्यानंतर कोणत्या खेळाडूंना पुरस्कार मिळाले हे पाहू (Award Winners PKL 8).

अंतिम सामन्याचे पुरस्कार
अंतिम सामन्यातील सर्वोत्तम रेडर – नवीन कुमार (दबंग दिल्ली) – ५० हजार
अंतिम सामन्यातील सर्वोत्तम डिफेंडर – मनजित छिल्लर (दबंग दिल्ली) – ५० हजार
अंतिम सामन्यातील गेम चेंजर – विजय मलिक (दबंग दिल्ली) – ५० हजार
अंतिम सामन्यातील सर्वोत्तम क्षण – विजय मलिक (दबंग दिल्ली)

These super 🌟🌟 stole the show in tonight's final! 🤩@Vivo_India Perfect Raider of the Match ➡️ Naveen Kumar@TataMotors Ace Defender of the Match ➡️ Manjeet Chhillar@Dream11 Gamechanger of the Match ➡️ Vijay#VIVOProKabaddi #SuperhitPanga #PATvDEL @DabangDelhiKC pic.twitter.com/ukvrhaAz4n

— ProKabaddi (@ProKabaddi) February 25, 2022

प्रो कबड्डी लीग २०२१-२२ मधील पुरस्कार
विजेता संघ – दबंग दिल्ली – ३ कोटी
उपविजेता संघ – पटना पायरेट्स – १.८० कोटी
आठव्या हंगामातील सर्वोत्तम रेडर – पवन शेरावत (बंगळुरू बुल्स) – १५ लाख
आठव्या हंगामातील सर्वोत्तम डिफेंडर – मोहम्मदरेझा शादलू (पटना पायरेट्स) – १५ लाख
आठव्या हंगामातील उदयोन्मुख खेळाडू – मोहित गोयत (पुणेरी पलटन) – ८ लाख
आठव्या हंगामातील सर्वोत्तम खेळाडू – नवीन कुमार (दबंग दिल्ली) – २० लाख

Mashal Sports New Young Player of the Match ➡️ Mohit Goyat

Most Valuable Player of the Tournament ➡️ Naveen Kumar#VIVOProKabaddi #SuperhitPanga #PATvDEL pic.twitter.com/LRwj9Tj8zS

— ProKabaddi (@ProKabaddi) February 25, 2022

प्रो कबड्डी विजेते
पहिला हंगाम – जयपूर पिंक पँथर्स
दुसरा हंगाम – यू मुम्बा,
तिसरा हंगाम – पटना पायरेट्स
चौथा हंगाम – पटना पायरेट्स
पाचवा हंगाम – पटना पायरेट्स
सहावा हंगाम – बंगळुरू बुल्स
सातवा हंगाम – बंगाल वॉरियल्स
आठवा हंगाम – दबंग दिल्ली

महत्त्वाच्या बातम्या – 

संपूर्ण यादी: प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात सर्वाधिक पाँइंट्स मिळवणारे टॉप ५ रेडर्स आणि डिफेंडर्स 

दबंग दिल्लीने पहिल्यांदाच जिंकले प्रो कबड्डीचे विजेतेपद, पाहा आत्तापर्यंतचे विजेते आणि उपविजेते संघ

केव्हा, कुठे आणि कसा पाहाल भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी२० सामना? जाणून घ्या एका क्लिकवर


Next Post
Tavish-Pahwa-and-Taksham-Saini

एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत तविश पाहवा, आनंदिता उपाध्याय यांना दुहेरी मुकुटाची संधी

Kamlesh-ShahBlack-and-Vikas-BachlooSkyblue

चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत महाराष्ट्र मंडळ, डेक्कन चार्जर्स संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

Shahnawaz-Dahani-MS-Dhoni

'धोनीला भेटून माझे मोठे स्वप्न पूर्ण झाले', पाकिस्तानी गोलंदाजाने सांगितला टी२० विश्वचषकादरम्यानचा किस्सा

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143