संपुर्ण नाव- दिपक लोकंदरसिंग चहर
जन्मतारिख- 7 ऑगस्ट, 1992
जन्मस्थळ- आग्रा, उत्तर प्रदेश
मुख्य संघ- भारत, चेन्नई सुपर किंग्स, भारत अ, भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, राजस्थान, राजस्थान रॉयल्स आणि राइजिंग पुणे सुपरजायंट्स
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध अफगाणिस्तान, तारिख – 25 सप्टेेंबर, 2018, ठिकाण – दुबई
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 8 जुलै, 2018, ठिकाण – ब्रिस्टोल
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 3, धावा- 18, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 3, विकेट्स- 2, सर्वोत्तम कामगिरी- 1/37
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 10, धावा- 1, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 10, विकेट्स- 17, सर्वोत्तम कामगिरी- 6/7
थोडक्यात माहिती-
-दिपक चहरचे वडिल लोकेंद्र हे त्याच्या जन्मानंतर भारतीय हवाई दलातून निवृत्त झाले. तर त्याचा चुलत भाऊ राहूल चहरनेही भारताकडून टी20 क्रिकेट खेळले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध 2019मध्ये त्याने हा एकमेव टी20 सामना खेळला आहे.
-राहूलला त्याच्या संघातील मयंक मार्कंडेच्या चांगल्या प्रदर्शनामुळे जास्त काळ क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही.
-चहरची बहीण मालती चहर ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने मॅनिक्यूअर (2017) आणि जिनियस (2018) या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने काही कमर्शिअल जाहिरातीही केल्या आहेत. शिवाय 2014 सालच्या एफबीबी मिस इंडिया स्पर्धेत ती उपविजेती ठरली होती.
-2008मध्ये राजस्थान क्रिकेट अकादमीचे डायरेक्टर ग्रेग चॅपेल यांनी चहरमधील वेगवान गोलंदाजी कौशल्याला हेरले.
-2010मध्ये हैद्रबादविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करत चहरने आणि पंकज सिंगने नवा इतिहास नोंदवला होता. पंकजने 11 धावा देत 2 विकेट्स घेतल्या आणि चहरने 10 धावा देत 8 विकेट्स घेतल्या. अशा प्रकारे हैद्राबाद त्या सामन्यात देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात कमी 21 धावांवर बाद झाला होता.
-9 वर्षांच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीत चहरने 45 सामने खेळत 126 विकेट्स घेतल्या आहेत. त्याला सतत होणाऱ्या दुखापतीने त्याला बराच काळ क्रिकेटपासून दूर रहावे लागले.
-तर, 2016मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध राइजिंग पुणे सुपरजायंट्समधून चहलने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तो 2 हंगाम राइजिंग पुणे सुपरजायंट्सचा भाग होता.
-2016-17 या आयपीएल हंगामात चहरचा फॉर्म खूप खराब होता.
-त्याने त्याच्या फॉर्मवरती पुढे खूप मेहनत केली आणि अखेर 2018मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे 2018-19मध्ये त्याला चेन्नई सुपर किंग्सने आपल्या संघात सामाविष्ट करून घेतले.
-चहर 135-140 किमी दर ताशी वेगाने गोलंंदाजी करू शकतो.
-चहरच्या गोलंदाजी कौशल्यामुळे निवडकर्त्यांनी त्याला तिरंगी मालिकेत संधी दिली होती. भारत अ, वेस्ट इंडिज अ आणि इंग्लंड लायन्स या संघात ती तिरंगी मालिका झाली होती. चहर या मालिकेत 10 विकेट्स घेत भारत अ संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू ठरला.
-जसप्रीत बुमराहला दुखापत झाल्यामुळे चहरला इंग्लंडविरुद्धच्या टी20 सामन्यात निवडण्यात आले होते. यावेळी 2018मध्ये टी20 मालिकेच्या तिसऱ्या सामन्यातून पदार्पण करत चहरने 4 षटकात 44 धावा देत 1 विकेट घेतली होती.