संपुर्ण नाव- जॅकोब जोसेफ मार्टिन
जन्मतारिख- 11 मे, 1972
जन्मस्थळ- बडोदा, गुजरात
मुख्य संघ- भारत, आसाम, बडोदा आणि रेल्वे
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज (लेगब्रेक गुगली)
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 11 सप्टेंबर, 1999
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 10, धावा- 158, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-जॅकोब जोसेफ मार्टिन यांनी 1991-92च्या रणजी ट्रॉफी हंगामात बडोदा संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यावेळी गुजरात विरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात त्यांनी 50 धावा करत 5 विकेट्स घेतल्या होत्या.
– पुढे मार्टिनच्या खेळीने त्यांना देशांतर्गत क्रिकेमधील चांगला फलंदाज आणि अधूनमधून गोलंदाजी करणारा फिरकीपटू अशी ओळख निर्माण करून दिली.
-1998-99चे वर्ष त्यांच्यासाठी विशेष ठरले. या काळात त्यांनी रणजी ट्रॉफीच्या एका हंगामात 103.70च्या सरासरीने 1037 धावा केल्या होत्या. यात त्यांच्या 5 शतकांचाही समावेश होता.
-मार्टिन यांच्या खेळीने त्यांचा बडोदा संघाकडून एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला होता. तसेच त्यांच्या 5 शतकांच्या विक्रमाचीही नोंद झाली होती. तसेच ते रणजी ट्रॉफीच्या एका हंगामात 1000 धावा पूर्ण करणारे 6वे क्रिकेटपटू होते.
-पण, त्याच हंगामातील विजय भारद्वाज यांचा रणजी ट्रॉफीतील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ते मोडू शकले नाहीत. भारद्वाज यांनी 1998-99च्या रणजी ट्रॉफी हंगामात एकूण 1280 धावा केल्या होत्या.
-पुढे 2000-2001ला रणजी ट्रॉफीत संपूर्ण वर्षात 1000 धावा पूर्ण करण्याचा कारनामा मार्टिन यांनी पुन्हा केला होता.
-मार्टिन यांनी त्यांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 9 हजाराहून अधिक धावांचा पल्ला गाठला होता. तसेच त्यांनी 10 विकेट्सही घेतल्या होत्या.
-टोरनॅटो येथील 1999सालच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून वनडेत पदार्पण करणारे मार्टिन विशेष प्रदर्शन करू शकले नाहीत. 10 सामन्यांच्या वनडे कारकिर्दीत त्यांना अर्धशतकी खेळीही करता आली नव्हती. म्हणून त्यांनी 2001 साली वनडेतून निवृत्ती घेतली.
-तरीही त्यांची देशांतर्गत क्रिकेमधील कामगिरी मात्र त्यांनी चालू ठेवली. 2000-01 आणि 2001-02 या हंगामात मार्टिन यांनी बडोदा संघाला रणजी ट्रॉफी चषक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
-2001-02च्या हैद्राबादविरुद्धच्या सामन्यात 271 धावा त्यांनी केल्या होत्या. 1957-58 पासून बडोदाकडून खेळताना 250हून अधिक धावा करणारे ते पहिलेच फलंदाज ठरले होते.
-मार्टिन यांनी रेल्वे संघाकडूनही काही रणजी ट्रॉफी सामने खेळले आहेत.
-2011 साली युकेमध्ये अस्तित्वात नसणाऱ्या अजवा स्पोर्ट्स क्लबमध्ये युवा खेळाडूंची तस्करी करण्याच्या आरोपमध्ये मार्टिन यांना अटक करण्यात आले होते. नंतर जामिन देऊन त्यांची सुटका करण्यात आली होती.
-2016 साली त्यांची बडोदा संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली होती.
-2018-19 मध्ये त्यांचा अपघात झाल्यामुळे ते एका महिन्यासाठी आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवरती होते. आता त्यांची तब्येत ठीक आहे. ते हॉस्पिटलमध्ये असताना त्यांची अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी मदत केली होती.