संपुर्ण नाव- सरनदिप सिंग
जन्मतारिख- 21 ऑक्टोबर, 1979
जन्मस्थळ- अमृतसर, पंजाब
मुख्य संघ- भारत, पंजाब, दिल्ली आणि दिल्ली डेअरडेविल्स
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 25 ते 29 नोव्हेंबर, 2000
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 31 जानेवारी, 2002
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 3, धावा- 43, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 3, विकेट्स- 10, सर्वोत्तम कामगिरी- 4/136
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 5, धावा- 47, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 5, विकेट्स- 3, सर्वोत्तम कामगिरी- 2/34
थोडक्यात माहिती-
-ज्युनिअर स्तरावरती सरनदिप सिंग यांनी क्रिकेटची सुरुवात फलंदाजीने केली होती. त्यांनी 1998-99ला पंजाब विरुद्ध परियाणाच्या सामन्यात खेळताना 45 धावांची खेळी केली होती.
-पुढे त्यांना 19 वर्षांखालील भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली होती. तेव्हा त्यांनी 8 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. त्यांनी त्यांचा शेवटचा 19 वर्षांखालील सामना श्रीलंकाविरुद्ध खेळला.
-1999-2000च्या रणजी ट्रॉफी हंगामात 37 विकेट्स घेत सरनदिप यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत खेळण्याची संधी मिळाली होती.
-राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत त्यांना इरापल्ली प्रसन्ना आणि श्रीनिवास वेंकटराघवन यांच्या हाताखाली क्रिकेट शिकण्यास मिळाले.
-2000साली अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये भारतीय वरिष्ट संघाच्या विरुद्ध एनकेपी साळवे चॅलेंजर ट्रॉफीत सरनदिप यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. यावेळी त्यांनी 9 विकेट्स घेतल्या होत्या.
-सरनदिप सिंग यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात दमदार झाली होती. त्यांनी नोव्हेंबर 2000मध्ये कसोटीत झिम्बाब्वेविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. यावेळी त्यांच्या ऑफ स्पिन गोलंदाजीने सरनदिप यांनी 6 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता.
-सरनदिप खेळताना जास्त तर किरमीजी (maroon) रंगाची पगडी घालत असत.
-एवढेच नव्हे तर, सरनदिप हे पार्टिला जाताना मिकि माउसवाले टी-शर्ट घालत असत.
-गोलंदाज सरनदिप यांनी जॉर्जटाऊन येथील त्यांच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्यांदाच फलंदाजी केली होती. यावेळी वेस्ट इंडिजविरुद्ध 8व्या विकेटसाठी त्यांनी 120 चेंडूंचा सामना करत नाबाद 39 धावा करत, राहूल द्रविडसोबत 120 धावांची भागीदारी केली होती. हा सामना अनिर्णीत राहिला होता.
-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतरही सरनदिप रणजी ट्रॉफीत खेळत होते.
-2006 साली सरनदिप यांना दिल्ली संघातून हिमाचल प्रदेश या रणजी ट्रॉफी संघात स्थान देण्यात आले होते. कारण हिमाचल प्रदेशला फिरकीपटूची आवश्यकता होती. त्यांनी संपूर्ण हंगामात 28 विकेट्स घेतल्या होत्या.
-सरनदिप हे 2014 साली भारतीय निवड समितिचा भाग होते.