संपुर्ण नाव- वृद्धिमान प्रशांत साहा
जन्मतारिख- 24 ऑक्टोबर, 1984
जन्मस्थळ- शक्तिगड
मुख्य संघ- भारत, ऑल इंडिया इलेक्ट्रिसिटी बोर्ड, बंगाल, चेन्नई सुपर किंग्स, बंगाल क्रिकेट असोसिएशन एकादश, पुर्व विभाग, भारत अ, इंडिया ब्ल्यू, इंडिया इमर्जिंग प्लेयर्स, भारतीय बोर्ड अध्यभयी एकादश, किंग्स इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स, शेष भारतीय संघ आणि सनराइजर्स हैद्राबाद
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा यष्टीरक्षक फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 6 ते 9 फेब्रुवारी, 2010, ठिकाण – नागपूर
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 28 नोव्हेंबर, 2010, ठिकाण – गुवाहाटी
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 40, धावा- 1351, शतके- 3
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 9, धावा- 41, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-भारताचा यष्टारक्षक फलंदाज वृद्धिमान साहा हा त्याच्या कुमारवयात मध्यमगती गोलंदाज होता. त्याने लेदर बॉलने खेळायला सुरुवात केल्यानंतर तो यष्टीरक्षणास सुरुवात केली.
-क्रिकेट ही साहाची पहिली पसंत नव्हती. त्याला एफ1 ड्राईव्हर बनायचे होते. पण आर्थिक अडचणीमुळे त्याला ते करणे शक्य झाले नाही.
-साहाने क्रिकेटसाठी त्याच्या पदव्युत्तर शिक्षणाचा त्याग केला.
-साहाचे वडील प्रशांत साहा यांनी फुटबॉल आणि सीलीगुरी लीगमध्ये क्रिकेटही खेळले होते. पण तेही आर्थिक स्थितिमुळे त्यांची स्पोर्ट कारकिर्द पूर्ण करू शकले नाहीत. ते पश्चिम बंगालमध्ये इलेक्ट्रीसीटी बोर्डमध्ये काम करून आपले घर सांभाळत असत.
-साहाचे वडील हेच त्याचे आदर्श आहेत. त्याच्या वडिलांनी आई मैत्रियी यी दोघांनीही त्याला क्रिकेट क्षेत्रात पाठवण्यासाठी खूप मेहनत घेतली.
-साहाच्या लग्नामगाची कहानी खूप रोमांचक आहे. तो ऑर्कुटच्या माध्यमातून पहिल्यांदा त्याच्या पत्नीशी भेटला होता. 4 वर्षांच्या नातेसंबंधानंतर 2011मध्ये त्यांनी लग्न केले. त्याने त्याचा लग्न समारंभ हा गोपनीय ठेवला होता. त्यावेळी केवळ 200 व्यक्तिंना बोलावले होते. तो त्याची मुलगी अविला आपला लकी चार्म मानते.
-साहाचा सर्वात जवळचा मित्र हा त्याचा भाऊ अनिरबन हा आहे. तो इंजिनिअर आहे.
-साहाला क्रिकेट क्षेत्रात नियुक्ती होण्यासाठी नेहमीच खूप संघर्ष करावा लागला. राज्य स्तरावर त्याला बंगाल संघात प्रवेश मिळवण्यासाठी दिप दासगुप्ताने रस्ता मोकळा करेपर्यंत त्याला वाट पाहावी लागली. तर, राष्ट्रीय स्तरावर कसोटीत प्रवेश मिळवण्यासाठी धोनीने निवृत्ती घेईपर्यंत त्याला वाट पाहावी लागली.
-2014च्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या अंतिम आयपीएल सामन्यात साहाने 55 चेंडूत 115 धावा केल्या होत्या. यात त्याच्या 10 चौकारांचा आणि 8 षटकारांचा समावेश होता. यासह तो आयपीएलमध्ये अंतिम सामन्यात शतक ठोकणारा पहिला खेळाडू ठरला.
-साहाने येत्या काही काळात स्वत:ला भारतीय कसोटी संघाचा 1 नंबरचा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून सिद्ध केले. या शर्यतीत त्याने नमन ओझा, पार्थिव पटेल आणि दिनेश कार्तिकला मागे पाडले.
-कसोटीत त्याने 2015मध्ये श्रीलंकाविरुद्ध 2 अर्धशतके, 2016मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शतक आणि 2017मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 2 अर्धशतके ठोकत स्वत:ला सिद्ध केले. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत तो सामनावीर ठरला.
–धोनीने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 6 शतके ठोकली आहेत. तर, साहाने त्याच्या निम्मे म्हणजे 3 शतके केली आहेत. पण त्यांच्यातील फरक असा की, साहाने त्याचे पहिले शतक वेस्ट इंडिजच्या मैदानावर केले होते. तर, धोनी त्यातील एकही शतक भारतीय उपखंडाबाहेरच्या मैदानावर करू शकला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“रिमेंबर द नेम, कार्लोस ब्राथवेट” या ऐतिहासिक शब्दांचे जनक इयान बिशप्स
VIDEO: वडिलांची आठवण येताच हार्दिकच्या अश्रूंचा फुटला बांध; इरफानच्या गळ्यात पडत धाय मोकलून रडला