मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ई-सलाम क्रिकेट २०२० ला सांगितले, मी माझ्या वडिलांना वचन दिले होते की मी कधीही तंबाखूजन्य पदार्थ किंवा दारुची जाहिरात करणार नाही. सचिन म्हणाला, माझ्या वडिलांनी मला सांगितले की मी एक आदर्श आहे आणि बरेच लोक तुझं अनुकरण करतील. म्हणूनच मी कधीही तंबाखूजन्य पदार्थ किंवा दारुचे समर्थन केले नाही.
सचिन (Sachin Tendulkar) म्हणाला, “१९९० च्या दशकात माझ्या बॅटवर कोणताही स्टिकर नव्हता. माझ्याकडे करार नव्हता, परंतु संघातील प्रत्येकजण विशेषत: विल्स आणि फोर स्क्वेयरला प्रोत्साहन देत होते. परंतु तरीही मी वडिलांना दिलेले वचन मोडले नाही. या ब्रँड्सला समर्थन दिले नाही.”
“त्यांच्या ब्रँडचे स्टिकर्स बॅटवर लावून प्रोत्साहन देण्यासाठी मला अनेक प्रस्ताव आले. पण मला या सर्वांचे समर्थन करायचे नव्हते. मी या दोन्ही गोष्टींपासून दूर (सिगारेट आणि मद्याचे ब्रँड्स) राहिलो. आणि माझ्या वडिलांना दिलेले वचन कधीच मोडले नाही,” असेही तो पुढे म्हणाला.
“आपण सर्वजण कोरोनो व्हायरसचा पराभव करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या संघात आहोत. आपल्याला स्वत:शी स्पर्धा करण्याची गरज नाही. आपल्याला विषाणूचा पराभव करण्याचे मार्ग काढावे लागतील. जरी एखाद्याला आर्थिक किंवा इतर कोणत्याही मार्गाने मदत करायची असेल, तर एखाद्याने आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन केले पाहिजे. कोविड-१९ विरुद्धच्या लढ्यात आपल्याला संघ म्हणून काम करावे लागेल,” असे कोरोनो विषाणूबद्दल बोलताना सचिन म्हणाला.
“हे लोकांसाठी कठीण आहे. आरोग्य मंत्रालय लोकांनुसार सूचना देत आहे. मला हा संदेश सांगायचा आहे, की जीवनामध्ये वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे. जर दिशा योग्य असेल, तर आपण वेग वाढवू शकतो. आपल्याला आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. हे कठीण आहे. परंतु आपण ते करणे आवश्यक आहे,” असेही तो पुढे म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-लवकरच तयार होणार १९ पीचवालं देशातील पहिलं मैदान, महाराष्ट्रातील लाल मातीचा केलाय खास उपयोग
-गंभीर म्हणतो; ती गोष्ट मिळवली नाही तर कोहलीची कारकिर्द अधुरीच
-तुम्ही त्याला वाईट म्हणून तुमच्यातील जळकी वृत्ती दाखवून दिली