पुणे, 25 ऑगस्ट 2023: महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या वतीने आयोजित 60व्या राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत अखेरच्या ११ व्या फेरीची लढत सहजपणे बरोबरीत सोडविताना ग्रँडमास्टर एस. पी. सेतुरामनने विजेतेपद संपादन केले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथील बॉक्सिंग हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत अकराव्या फेरीत सेतुरामनने ग्रँडमास्टर मित्रबा गुहाविरुद्ध पहिल्या पटावर आत्मविश्वासाने खेळताना सहजपणे बरोबरी साधली व या स्पर्धेतील अपराजित वाटचाल कायम राखली. सेतुरामनने ११ फेऱ्यांमधून ९.५ गुणांची कमाई केली. त्यात ८ विजय व ३ बरोबरी अशी कामगिरी आहे.
याआधी २०१४ मध्ये ही स्पर्धा जिंकणाऱ्या सेतुरामनचे हे दुसरे राष्ट्रीय विजेतेपद आहे. गुहाने याआधी पुण्यात झालेल्या फिडे रेटिंग रॅपिड स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. परंतु तो सेतुरामनला रोखू शकला नाही.
दुसऱ्या पटावर खेळणाऱ्या अग्रमानांकित अभिजीत गुप्तानेही पांढरी मोहरी घेऊन खेळताना अरोण्यक घोष विरुद्धच्या प्रदीर्घ लढती अखेर बरोबरी साधली आणि स्पर्धेत नववे स्थान मिळविले. तामिळनाडूच्या विष्णू, प्रसन्न. व्ही याने ग्रँड मास्टर अभिमन्यू पुराणिकचा पराभव करून 9गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. तर, आरएसपीबीच्या अरोण्यक घोषने तिसरा क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील विजेत्या सेतुरामन एसपीला ऍडव्होकेट संकेत फुके स्मृती करंडक व ६लाख रुपये, तर उपविजेत्या विष्णु प्रसन्ना व्ही याला करंडक व ५लाख रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. याशिवाय तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या अरोण्यक घोषला करंडक व ४लाख रुपये, चौथा क्रमांकास करंडक व ३लाख रुपये आणि पाचव्या क्रमांकास करंडक व २लाख ५० हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार नरेश शर्मा आणि राज्याच्या क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर, मानद सचिव निरंजन गोडबोले, खजिनदार विलास म्हात्रे, पीडीसीसीच्या आरबीटर कमिशनचे अध्यक्ष राजेंद्र शिदोरे आणि चीफ आरबीटर गोपा कुमार आदी मान्यवर उपस्थित होते. (PSPB Grandmaster Sethuraman SP wins National Chess Championship 2023)
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अकरावी फेरी: व्हाईट व ब्लॅक यानुसार:
सेतुरामन एसपी(9.5गुण)(पीएसपीबी) बरोबरी वि.मित्रभा गुहा(8.5गुण)(पश्चिम बंगाल);
अभिजीत गुप्ता(8.5गुण)(पीएसपीबी) बरोबरी वि.अरोण्यक घोष(8.5गुण)(आरएसपीबी);
विष्णू, प्रसन्न. V(9 गुण)(तामिळनाडू)वि.वि.अभिमन्यू पुराणिक(8 गुण)(एएआय);
दिप्तयन घोष(8.5गुण)(पश्चिम बंगाल) बरोबरी वि.विघ्नेश एनआर(8.5गुण)(आरएसपीबी);
सूर्य शेखर गांगुली(8.5गुण)(पीएसपीबी)वि.वि.सुयोग वाघ (7.5गुण)(महा);
व्यंकटेश एमआर(8 गुण)(पीएसपीबी) बरोबरी वि.विशाख एनआर(8 गुण)(आरएसपीबी);
इनियान पी(8 गुण)(तामिळनाडू) बरोबरी वि.नितीन एस.(8 गुण)(आरएसपीबी);
उत्कल साहू (7.5 गुण)(ओडिशा) पराभुत वि.नीलाश साहा (8.5गुण)(आरएसपीबी);
कार्तिकेयन पी.(8गुण)(आरएसपीबी) बरोबरी वि.श्रीहरी एलआर(8गुण)(तामिळनाडू);
कृष्णा सीआरजी(8 गुण)(आरएसपीबी) बरोबरी वि.अपूर्व कांबळे(8गुण)(कर्नाटक);
दिनेश शर्मा(7गुण)(एलआयसी) पराभुत वि.सायंतन दास(8गुण)(आरएसपीबी);
जॉन, वेनी अक्कराकरन(7 गुण)(केरळ) पराभुत वि.दीप सेनगुप्ता(8गुण)(पीएसपीबी);
आकाश जी(7 गुण)(तामिळनाडू) पराभुत वि लक्ष्मण आरआर(8 गुण)(आरएसपीबी);
सिद्धांत मोहपात्रा(7.5 गुण)(आरएसपीबी) बरोबरी वि.सोहम कामोत्रा(7.5 गुण)(जम्मू व काश्मीर);
राजेश नायक(7 गुण)(ओडिशा) पराभुत वि.अर्घ्यदीप दास(8 गुण)(आरएसपीबी);
मनीषा मोहंती (7.5गुण)(एलआयसी) बरोबरी वि.उत्सव चॅटर्जी(7 गुण)(पश्चिम बंगाल);
श्यामनिखिल पी(7.5 गुण)(आरएसपीबी)वि.वि.राम कृष्णन(6.5 गुण)(बीएसएनएल);
अनुज, श्रीवात्री(7.5 गुण)(मध्यप्रदेश)वि.वि.हरीश शर्मा(6.5 गुण)(दिल्ली);
मेहर चिन्ना रेड्डी सीएच(7 गुण)(आरएसपीबी) बरोबरी वि.मुम्मना वेंकट रित्विक(7 गुण)(आंध्रप्रदेश);
आकाश जी(7 गुण)(तामिळनाडू) बरोबरी वि.श्रीहरी एल(7 गुण)(पुद्दुचेरी);
प्रणव केपी(6.5 गुण)(तामिळनाडू) पराभुत वि.अभिषेक केळकर(7.5 गुण)(महा).
महत्वाच्या बातम्या –
नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स संघाचा अंतिम फेरीत प्रवेश
आशियाई क्रीडा स्पर्धेकरीता महाराष्ट्राच्या २ पुरुष आणि २ महिला खेळाडूंना भारतीय कबड्डी संघात संधी