भारताकडून टी20 संघात रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांच्यात कोणाला खेळवायचे याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. पण चेतेश्वर पुजाराने सांगितले की, “ऑस्ट्रेलियात पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषकाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन्ही यष्टिरक्षक फलंदाजांचा समावेश करण्यात यावा.”
फिनिशरची भूमिका बजावण्यासाठी निवडलेल्या दिनेश कार्तिकला आशिया चषक स्पर्धेत फलंदाजीची संधीच मिळाली नाही, तर रिषभ पंत फलंदाजीला आला तेव्हा फारसा प्रभाव पाडू शकला नाही. असे असूनही, पुजाराला अजूनही वाटते की पंत मधल्या फळीत असावा आणि कार्तिक फिनिशर म्हणून संघात असावा. त्यामुळे आता पुजाराने दिलेल्या या सल्ल्यानुसार विचार केल्यास भारताला दोन्ही बाजूने मदत मिळेल मात्र, संघात एका गोलंदाजीची उणीव भासू शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
RSWSमध्ये रविवारी क्रिकेटप्रेमींसाठी मेजवानी! एकाच दिवशी ‘जयसूर्या-लारा’सह अनेक दिग्गज खेळणार सामना
टी-२० विश्वचषकात बुमराह आणि हर्षल पटेल खेळणार! दोघांनी मिळवलीये फूल फिटनेस