कराटे खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू झालेली अल्टिमेट कराटे लीग (UKL) सिझन २.० यंदा उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊ येथील बाबू बनारसी दास बॅडमिंटन अकादमीमध्ये ३ ते १२ डिसेंबर २०२१ या कालावधीत होत आहे. ‘पुणे डिव्हाईन’चा संघ या लीगमध्ये ‘विनिंग किक’ मारून स्पर्धेचे विजेतेपद पटवण्यासाठी सज्ज झाला आहे, अशी माहिती ‘पुणे डिव्हाईन’चे संघमालक विजय चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
युकेएलमध्ये एकूण सहा फ्रँचायझी-आधारित संघ सहभागी होणार आहेत. ‘पुणे डिव्हाईन’सह यूपी रेबल्स, दिल्ली ब्रेव्हहार्ट्स, मुंबई निंजा, पंजाब फाइटर्स, बेंगळुरू किंग्स या संघांचा समावेश आहे. प्रत्येक संघात एक वर्ल्ड चॅम्पियन आणि एक युरोपियन चॅम्पियन मार्की खेळाडू असेल. प्रत्येक संघात पाच पुरुष आणि एक महिला खेळाडू आहे.
महत्वाच्या बातम्या-
Video: हे चित्र आशादायी! देशाबाहेरील छावणीत अफगान मुले लुटतायेत क्रिकेटचा आनंद