पुणे: पुणे इन्व्हीटेशनल सुपरक्रॉस २०१९ या भारतातील सर्वांत मोठ्या सुपरक्रॉस च्या ५ व्या पर्वाचे आयोजन हे १० फेब्रुवारी २०१९ रोजी करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. सलग चार वर्षे यशस्वी आयोजन केल्यानंतर आता पुणे इन्व्हीटेशनल सुपरक्रॉस आपले पाचवे गिअर टाकत असून त्यामुळे ही स्पर्धा अधिक वेगवान आणि अधिक चांगली होणार आहे.
पुणे इन्व्हीटेशनल सुपरक्रॉस ही आशान स्पोर्ट्सची संकल्पना असून यामध्ये सुपरक्रॉस रेसिंगची लोकांना माहिती मिळण्यासाठी तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना एकाच मंचावर आणत अनोखा खेळ कार्यक्रम भारतात आयोजित करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नांव पोहोचवण्याचा समावेश आहे. या पर्वामध््ये प्रथमच ‘ दि ऑल स्टार रेस’च्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू एकाच रेस मध्ये भाग घेऊन एकमेकांशी स्पर्धा करतील त्यामुळे चालकांना जागतिक स्पर्धांचा अनुभव मिळण्यास मदत होईल. यावेळी बोलतांना आशान स्पोर्ट्स चे सह संचालक ईशान लोखंडे यांनी सांगितले. ‘‘ पुणे इन्व्हीटेशनल सुपरक्रॉस ची सुरूवात ही भारतात साधारणपणे प्रचलित नसलेल्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयोगिक तत्वावर करण्यात आली होती, आजमितीला या स्पर्धेने नवीन उंची गाठली आहे. आमच्या सुविधांमुळे आमच्या चालकांनी ही भारतातील सर्वांत मोठी सुपरक्रॉस स्पर्धा बनली आहे.’’
याविषयी बोलताना आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रायडर केपी अरविंद यांनी “अशा लीग बरोबर सहकार्य करणे म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. या लीग मध्ये राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय रायडर्स ना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली आहे. या लीगची गुणवत्ता ही खेळाचे मुल्य वाढवणारी आहे. त्याचबरोबर लीग ने सुध्दा तरूण रायडर्स ना त्यांची कौशल्ये दर्शवण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देत आहे व खूप तरूण वयात या खेळा विषयी उत्सुकता निर्माण होण्यास मदत होईल” असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या कर्टन रेझर च्या दरम्यान अनेक राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावरील मोटरस्पोर्ट्स खेळाडूंची नावे समोर येणार आहेत. यामध्ये ट्रेव्हिस पिट्ट, डस्टीन फेरेस,अॅरोन मेर, मायकल डोर्हथी, व्हिटली गुसेव्ह, सी डी जिनान, ऋग्वेद बारगुजे, ईशान दसानायके, पृथ्वी सिंग यांचा समावेश आहे. या पर्वामध्ये प्रथमचज्युनियर रायडर्स ही असणार आहेत जसे युवारज कोंडे देशमुख, करण कार्ले, सार्थक चव्हाण, प्रज्वल विश्वनाथन आणि तानिका शानभाग (१६, सातारा) ही एकमेव मुलगी आपल्या पुरूष सहका-यांशी स्पर्धा करणार आहे. म्हणजेच सुपरक्रॉसची ही राणी ठरणार आहे.
नंतर या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून बहुप्रतिक्षित असा कार्यक्रम म्हण्जे ३० चालकांचा लिलाव करण्यात आला. प्रत्येक संघाला ३ लाख गूण देण्यात आले होते व त्यांतून अजमेरा रेसिंग इंडिया, स्टॅलिअन रायडर्स, पी बी रेसिंग, आयबेक्स स्पोर्ट्स, लिलेरिया मोटरस्पोर्ट्स, गगन डेव्हलपर्स सुपरक्रॉस टिम अशा सहा टिम्स मध्ये सामना होऊन त्यांनी आपल्याकडे सर्वोत्कृष्ट रायडर्स मिळवले. या ३० रायडर्स ना चार प्रकारांत म्हणजेच एसएक्स १ फॉरेन प्रो, एसएक्स२- इंडियन प्रो, एसएक्स प्रो ३ – इंडियन एक्सपर्ट्स, एसएक्स ४ – इंडियन रायडर (ज्युनियर्स) यांचा समावेश होता. प्रत्येक टिमला ६ रायडर्सची एक टिम अशा पुढील प्रकारे टिम्स तयार करायच्या आहेत – एसएक्स १ प्रत्येक टिम मध्ये एक रायडर हवा, एसएक्स २ – १ रायडर प्रत्येक टिम मध्ये असणे आवश्यक आहे. एसएक्स३- प्रत्येक टिम मध्ये २ रायडर असणे आवश्यक आहे, एसएक्स४- प्रत्येक टिम मध्ये २ रायडर्स असणे आवश्यक आहे.
प्रेक्षकांना यावेळी लाईव्ह संगीत, आंतरराष्ट्रीय रेसिंग सर्किट्स व अशा अनेक गोष्टी या पुणे इन्व्हीटेशनल सुपरक्रॉस मध्येपहायला मिळणार आहेत.