पुण्यात पार पडलेल्या पहिल्या स्पोर्टस् फॉर ऑल (एसएफए)अजिंक्यपद स्पर्धेत पीआयसीटी मॉडेल स्कुल संघाने 53 पदकांसह अव्वल स्थान पटकावत विजेतेपद संपादन केले. तर, सीएम इंटरनॅशनल स्कूल संघाने 24पदकांसह दुसरा, विद्या व्हॅली स्कूल संघाने 22पदकासंह तिसरा क्रमांक पटकावला.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत पीआयसीटी मॉडेल स्कुल संघाने 212गुणांसह 12सुवर्णपदक, 21 रजत आणि 20 कांस्य पदकाची कमाई करत विजेतेपदाचा मान पटकावला. फुटबॉल आणि ऍथलिट्स प्रकारात जैनम सिंघवी आणि राजलक्ष्मी चव्हाण यांनी सुरेख कामगिरी करत गोल्डन पुरस्कार व 25000रूपये पारितोषिक रक्कम पटकावली.
स्पोर्ट्स फॉर ऑलचे मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी समेरा खान म्हणाले की, पुण्यात पार पडलेल्या पहिल्याच या स्पर्धेच्या मालिकेला शाळा आणि युवा खेळाडूनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे आम्हाला खुप आनंद झाला आहे. तसेच, या स्पर्धेतील सहभागी शाळा आणि खेळाडूंची गुणवत्ता पाहून खऱ्या अर्थाने शहरातील क्रिडा क्षेत्राचा विकास होत आहे. या स्पर्धेचा एकूण प्रतिसाद आणि मिळालेला प्रतिसाद याचा विचार करून, या स्तरावर योग्य क्रीडा संस्था निर्माण होईल याची खात्री आहे. विजेत्या पीआयसीटी मॉडेल स्कुलचे अभिनंदन करतो व दुसऱ्या मालिकेत इतर शाळा सहभागी होऊन भविष्यात विजेतपद पटकावतील अशी आशा करतो.
स्पर्धेतील विजेत्या पीआयसीटी मॉडेल स्कुल संघाला करंडक, 1लाख रूपये अशी पारितोषिके देण्यात आली.
पीआयसीटी मॉडेल स्कुलचे क्रिडा विभगाचे मुख्य श्रीदेवी जगदाळे म्हणाले की, एसएफए अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच मालिकेत विजेतपद पटकावने ही आमच्यासठी अभिमानाची गोष्ट आहे. या स्पर्धेत आमच्या खेळाडूंनी केलेल्या अफलातून कामगिरी केल्यामुळे आम्ही हे विजेतेपद पटकावू शकलो, त्यामुळे त्यांचा आम्हाला अभिमान आहे. ऑलिम्पिक प्रमाणे एसएफए अजिंक्यपद आयोजित करुन युवा खेळाडूंना आपला गुणवत्ता सादर करता आली. सहभागी सर्व संघांचे व विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरी बद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. एसएफए अजिंक्यपद पुढील वर्षी आयोजन करतील अशी आशा आहे व आगमी मालिकेत अधिकाधिक स्पर्धक सहभागी होतील याची मला खात्री आहे.
स्पर्धेतील उपविजेत्या सीएम इंटरनॅशनल स्कूल संघाला 50000रूपये, तर तिसरा क्रमांक पटकावनाऱ्या विद्या व्हॅली स्कूल संघाला 25000रूपये अशी पारितोषिके देण्यात आली.
लॉयला हायस्कूलच्या 81गुणांसह (5सुवर्णपदक, 5रजत)ने चौथा, तर डॉ कलमाडी हायस्कूल (61गुणांसह, 5सुवर्ण, 5रजत आणि 7कांस्य) संघाने पाचवा क्रमांक पटकावला. या दोन्ही संघाना प्रत्येकी 10000रूपये अशी पारितोषिके देण्यात आली.
याशिवाय, स्पर्धेच्या अंतिम दिवशी जलतरणमध्ये 18वर्षखलील मुलींच्या गटात मराठवाडा मित्र मंडळ विद्या मंदीरच्या नंदिनी मेनकर हिने 50मीटर व 100मी फ्री स्टाईल मध्ये अनुक्रमे 32.30से व 1.15.73 सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीला घाबरतो शाहरुख खान! म्हणाला, ‘जेव्हा तो केकेआरविरुद्ध फलंदाजीला येते…’
केवळ 34 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारुंच्या नाकी-नऊ, कागिसो रबाडाने दिले लागोपाठ धक्के