पुणे । पुणे महानगरपालिका यांच्या तर्फे पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाने व्हायब्रन्ट स्मॅशर्स 14-13 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद संपादन केले.
डेक्कन जिमखाना क्लब येथील टेबल टेनिस हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या लढतीत साई बगाटे, वेदांग जोशी, वैभवी खेर, सुयोग्य पाटील, गौरव लोहपत्रे, धनश्री पवार यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर एसएसएमएफ टॉसर्स संघाने व्हायब्रन्ट स्मॅशर्स 14-13 असा पराभव केला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, पीएमसीच्या क्रीडा विभागाचे पब्लिक इन्फॉर्मेशन अधिकारी सुभाष पुरी, पीडीटीटीएचे अध्यक्ष राजीव बोडस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीडीटीटीएचे उपाध्यक्ष स्मिता बोडस व प्रकाश तुळपुळे, पीडीटीटीएचे सचिव श्रीराम कोनकर, सुदेश शेलार मेमोरियल फाउंडेशनचे राजेश शेलार आणि विक्रम गुर्जर आणि सिम्बायोसिस स्पोर्ट्स सेंटरचे सतीश ठिगळेआदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
एसएसएमएफ टॉसर्स वि.वि.व्हायब्रन्ट स्मॅशर्स 14-13(पुरुष एकेरी गट: शुभांकर रेनविलकर पराभूत वि.वि.रोहित चौधरी 11-4, 9-11, 10-11; कुमार व कॅडेट मुले दुहेरी गट: साई बगाटे/वेदांग जोशी वि.वि.प्रणव अब्दलवार/नंदिश पटेल 11-10, 10-11, 11-8; सब-ज्युनिअर मुले एकेरी गट: आदी फ्रॅंक अगरवाल पराभूत वि.अनय कोवेलमुडी 3-11, 9-11, 6-11; मिश्र दुहेरी गट: वैभवी खेर/सुयोग्य पाटील वि.वि.अंकिता पटवर्धन/वेदिका भेंडे 11-8, 11-9, 11-4; प्रौढ एकेरी गट: शेखर काळे पराभूत वि.उपेंद्र मुळ्ये 9-11, 11-7, 6-11; कुमार मुले एकेरी गट: गौरव लोहपत्रे वि.वि.श्रीयश भोसले 8-11, 11-9, 11-10; सब-ज्युनिअर मुली एकेरी गट: धनश्री पवार वि.वि.मयुरी ठोंबरे 8-11, 11-7, 11-7; मिश्र दुहेरी सब-ज्युनिअर मुले व कॅडेट मुली: आदी फ्रॅंक अगरवाल/रिया फाटक पराभूत वि.अनय कोवेलमुडी/आनंदिता लुनावत 8-11, 9-11, 11-6)