fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम २०१९: द टर्फ क्लब ट्रॉफीमध्ये ऑसम वन विजेता

पुणे। पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019 या स्पर्धेत ऑसम वन या घोड्याने 1400मीटर अंतरावरच्या द टर्फ क्लब ट्रॉफी या मुख्य शर्यतीमध्ये चमकदार कामगिरी करत विजय मिळवला.

रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब(आरडब्लूआयटीसी)येथे सुरु असलेल्या या स्पर्धेच्या पाचव्या दिवशी द टर्फ क्लब ट्रॉफी या महत्वाच्या लढतीत एरिअन हॉर्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी डी.ए.नंदा, ईशा नंदा भोजवानी व अमिताभ नंदा, सुल्तान सिंग यांच्या मालकीच्या ऑसम वन या घोड्याने 1 मिनिट 26 सेकंद व 061 मिनिसेकंद वेळ नोंदवून प्रथम क्रमांक पटकावला. याचा सुरज नरेदू हा जॉकी होता, तर दिपेश नरेदू ट्रेनर होता.

सविस्तर निकाल

द टर्फ क्लब ट्रॉफी:

विजेता: ऑसम वन,
उपविजेता: परफेक्ट स्टार.

You might also like