महाराष्ट्रातील कुस्तीच्या महान परंपरेला गालबोट लावणारी घटना नुकतीच सांगली येथील मैदानात घडली. मानाच्या सांगली महापौर चषक कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचा मल्ल माऊली कोकाटे याने इराणचा मल्ल हमीद इराणी याला चालू सामन्यात मारहाण केली. या घटनेनंतर कुस्ती शौकिनांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
सांगली महापौर कुस्ती चषक स्पर्धेत रविवारी (19 मार्च) लक्षणीय कुस्ती सामने पाहायला मिळाले. यामध्ये महाराष्ट्र तसेच जगातील अनेक नामवंत मल्ल सहभागी झाले होते. या मैदानावर एकूण 57 सामने खेळले जाणार होते. पहिल्या क्रमांकाची कुस्ती पुण्याचा माऊली कोकाटे विरुद्ध इराणचा हमीद इराणी यांच्या दरम्यान खेळली गेली. तब्बल एक तास 20 मिनिटे चाललेल्या या कुस्तीत दोन्ही मल्ल निकराची झुंज देत होते. मात्र, अखेरीस माऊली याचा संयम सुटला. त्याने इराणी याच्या डोक्यात दोनदा प्रहार केले. त्यामुळे इराणी थेट मैदानावर आडवा झाला. यानंतर माऊली याने आपण विजयी झाल्याचा अविर्भाव देखील दाखवला.
या प्रकारावर उपस्थित कुस्तीशौकीनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर आयोजक व उपस्थितांच्या निर्णयानुसार सामना बरोबरीत सोडवण्यात आला. तसेच, काही मल्लांनी माऊली याच्यावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने कारवाई करावी, अशी मागणी देखील केली आहे.
(Pune Wrestler Mauli Kokate Hit Irani Wrestler Hameed Irani In Sangali Competition)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘ग्रेस’फुल विजयासह युपी वॉरियर्झ WPL एलिमिनेटरमध्ये! आरसीबी-गुजरात स्पर्धेबाहेर
जय भोलेनाथ! विराट-राहुलनंतर उमेश यादवही पोहोचला महाकालेश्वराच्या दरबारी, भल्या पहाटे घेतले दर्शन