Loading...

पुणेरी पलटनच्या कर्णधारपदी सुरजीत सिंगची नेमणूक, टीमच्या नव्या जर्सीचेही झाले आनावरण

पुणे। आगामी सातव्या सीजनसाठी पुणेरी पलटन संघाच्या कर्णधारपदी सुरजीत सिंग या उमद्या आणि डायनॅमिक खेळाडूची निवड करण्यात आली आहे. तिसऱ्या सीजनमध्ये हा स्टार खेळाडू पुण्याच्या संघामध्ये खेळला होता आणि आता हा संघाचे नेतृत्‍व करणार आहे. तर मागील वर्षी कर्णधार असलेला गिरिष एर्नाक यावर्षी संघाचे उपकर्णधारपद सांभाळेल.

मार्चमध्ये नवीन लोगो सादर केल्यानंतर, पुणेरी पलटन या संघाने आता आपल्या खेळाडूंना नवा फ्रेश लूक देण्यासाठी नव्या जर्सीचेही अनावरण केले आहे. संपन्‍न महाराष्ट्रीय संस्कृती लक्षात घेऊन ही नवीन जर्सी तयार करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या समृद्धीचे प्रतिक असलेला केशरी रंग यात वापरण्यात आला असून आधुनिक एकात्मता आणि संघाच्‍या चैतन्‍याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी या जर्सीमध्ये विविध रंगछटा आणि पॅटर्न्स देण्यात आले आहेत.

प्रेक्षकांना मंत्रमुग्‍ध करणारे खेळाडूंचे खास आगमन हे या इव्हेण्टचे वैशिष्ट्य होते. यावेळी श्री. कैलाश कंडपाल, कप्तान सुरजीत सिंग, प्रमुख प्रशिक्षक अनुप कुमार यांच्यासह फोर्स मोटर्सच्या क्वालिटी विभागाचे वरीष्ठ उपाध्यक्ष श्री. मकरंद कानडे उपस्थित होते. यावेळी सातव्या सीजनसाठीच्या नव्या जर्सीचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना इन्शुअरकॉट स्पोर्टसचे सीईओ श्री. कैलाश कंडपाळ म्हणाले, ”आमचा नवीन लोगो आणि जर्सी मूळच्या ब्रॅण्ड कथेसह संघाची आधुनिक आणि जागतिक ओळख दर्शवितो. हा नवीन परिचय खेळाच्या नूतनीकरणासह संघाच्या कामगिरीचेही दर्शन घडवतो. या तरुण पलटनची जबाबदारी यापुढे सुरजीत यांच्या हाती टीमचे कर्णधार म्हणून राहणार असून आम्ही स्वतःचा उच्च दर्जा कायम राखू. या प्रवासात आमचे समर्थन करणाऱ्या आमच्या सर्व भागीदारांचे मी आभार मानतो.”

Loading...

पुणेरी पलटनचे प्रमुख प्रशिक्षक अनुप कुमार म्हणाले, ”सुरजीत हा संघासाठी एक मौल्यवान हिरा आहे आणि तो निश्चितपणे संघाला उत्तम मार्गदर्शन करेल. त्याच्याकडे संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे आणि मला विश्वास आहे की, या सीझनमध्ये त्यांच्या नेतृत्वामुळे आम्ही लांबचा पल्ला गाठू शकू. सध्याच्या संघात आणि सुरजीतसारख्या नेतृत्‍वासोबत मला विश्वास आहे की, या हंगामात आम्ही उत्तम सादरीकरण करणार आहोत.”

पुणेरी पलटनचा कर्णधार म्हणून नेमणूक झाल्याने आनंदलेला सुरजीत याने सांगितले की, ”व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे मला फार आनंद झाला आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आणि मला ही जबाबदारी दिल्याबद्दल मी अनुप सर आणि कैलाश सर यांचे आभार मानतो. सीजन ३ नंतर पुणेरी पलटनचा हा माझा दुसरा मुकाबला आहे आणि पुनरागमनाबरोबरच संघाची आघाडी घेण्याची संधी मिळण्याहून अधिक चांगले माझ्यासाठी काहीही नाही. अनुप सर यांच्या मार्गदर्शनाखाली, आम्ही लीगसाठी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण घेत आहोत आणि आम्ही सर्वच स्पर्धेसाठी सज्ज आहोत.”

Loading...

फोर्स मोटर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रसन फिरोदिया म्हणाले, “कबड्डी हा एक स्वदेशी आणि लोकप्रिय खेळ आहे. आमच्या ग्रामीण ग्राहकांमध्ये बहुतेक ग्राहक हा खेळ पाहतात. या मातीत भिनलेल्या खेळाचे समर्थन असोसिएशन नेहमीच करत असून आमची उत्पादन श्रेणीही या खेळाप्रमाणेच स्वदेशी, मजबूत आणि टिकाऊ आहे. आमचे कार्गो किंग, शक्तिमान पिक-अप आणि सन्मान आणि बलवान कृषी ट्रॅक्टर्स या गुणधर्मांचे अनुकरण करतात. पुणेरी पलटनच्या आमच्या स्थानिक पुणे संघाचे मुख्य भागीदार म्हणून आम्हाला याचा आनंद वाटतो. आम्ही संघाच्या थक्‍क करणा-या कामगिरीची आशा बाळगतो आणि या हंगामासाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो.”

Netmeds.comच्या विपणन व विक्री विभागाचे संचालक श्री. आनंद पाठक म्हणाले, ”ब्रँड म्हणून नेटमेड्स नेहमीच देशाच्या क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पुणेरी पलटन व प्रो कबड्डी लीग यांच्या सहकार्याने चालविण्यास प्रेरित आहे. कबड्डी हा आपल्या मातीतला खेळ देशभरातील चाहत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचला असून या खेळाची वाढती लोकप्रियता पाहून आम्ही रोमांचित झालो आहोत. नेटमेड्स आपल्या देशाच्या दूरस्थ कानाकोपऱ्यांतही स्वस्त आरोग्यसेवा आणि औषधांच्या उपलब्धतेला सक्षम बनविण्याचा प्रयत्न करत असल्याने ही भागीदारी आमच्या मोठ्या ध्येयासाठी आम्हाला उपयुक्त ठरणार आहे. पुणेरी पलटनचे सहप्रायोजक म्हणून या प्रवासाचा अविभाज्य भाग होता आल्याचा आम्हाला आनंद आहे. आगामी सीजनमध्ये संघाने उत्तम कामगिरी करावी ही आमची इच्छा आहे.”

सीजन ७ मधील पुणेरी पलटनच्या भागीदारांमध्ये फोर्स मोटर्स लिमिटेड (प्रमुख भागीदार Netmeds.com (सहयोगी भागीदार), बीकेटी टायर्स (सह-भागीदार), शिव-नरेश (किट पार्टनर), आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल (हॉस्पिटल पार्टनर) यांचा समावेश आहे.

यावर्षी संघात रणनीतिक अनुभव आणि तरुण्य चपलता यांचे मिश्रण आहे. नितिन तोमर, गिरीश एर्नाक, सुरजीत हे आपल्या शक्तीनिशी पलटनच्या टीममध्ये सहभागी होत आहेत. मनजीत, पवन कुमार आणि दर्शन कडियनसारखे तरुण प्रतिभावान खेळाडू या संघासाठी मौल्यवान जोड आहेत.

नवीन उत्साह, जिद्द आणि सर्वोत्‍तम संघ यांसह २० जुलैपासून सुरू होणाऱ्या विवो प्रो कबड्डी लीगच्या सातव्या आवृत्तीसाठी संघ तयार आहे. पुणेरी पलटन २२ जुलै २०१९ रोजी हैदराबादमध्ये हरियाणा स्टीलर्सविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. पुण्यात पुणेरी पलटनच्या होम लेगचे सामने १४ सप्टेंबर २०१९ ते २० सप्टेंबर २०१९ या काळात निर्धारित आहेत.

You might also like
Loading...