भारतीय खेळाडू नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये भालाफेक खेळात देशाची मान उंचावली आहे. तब्बल ८७.५८ मीटर अंतरावर थ्रो फेकत त्याने सुवर्ण पदक निश्चित केले आणि देशाला टोकियो ऑलिंपिक्समधील पहिले सुवर्ण पदक जिंकून दिले. त्याच्या या सोनेरी कामगिरीमुळे त्याच्यावर शुभेच्छांसह बक्षीसांचा वर्षाव होतो आहे. आता अशी माहिती पुढे येत आहे की, टोकियो ऑलिंपिकमध्ये इतिहास रचणाऱ्या नीरजचे नाव एका आर्मी स्टेडियमला दिले जाणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
टाइम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, पुणे येथील छावनी स्थित आर्मी स्पोर्ट्स इंस्टीट्यूटच्या ऍथलेटिक्स स्टेडियमला नीरजचे नाव देण्यात येणार आहे. २३ ऑगस्ट रोजी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत या स्टेडियमचा नामकरण सोहळा पार पडणार आहे. यावेळी त्यांच्या हस्ते स्टेडियमला गोल्डन बॉय नीरजचे नाव दिले जाईल.
यानंतर हे स्टेडियम ‘नीरज चोप्रा आर्मी स्पोर्ट्स इंस्टीट्यूट, पुणे छावणी‘, या नावाने ओळखले जाईल. नीरजसाठी ही मोठ्या सन्मानाची बाब ठरणार आहे.
Defence Minister Rajnath Singh likely to name stadium after Olympic javelin gold medalist Neeraj Chopra during visit to Pune on August 23: Officials
— Press Trust of India (@PTI_News) August 20, 2021
एका आर्मी ऑफिसरने स्टेडियमचे वर्गीकरण करताना सांगितले की, “हे स्टेडियम आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्टेडियम आहे. येथे दररोज ऍथलिट्स सराव करण्यासाठी येत असतात. अद्याप या स्टेडियमला कोणत्या मोठ्या व्यक्तीचे नाव देण्यात आलेले नाही. त्यामुळे देशाला पहिलेवहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरजचे नाव या स्टेडियमला देणे ही त्याच्यासाठी चांगली भेट ठरेल.”
नीरजविषयी थोडंसं
भारतीय लष्करात नायब सुभेदार असणाऱ्या नीरजने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ५vमेगा क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. त्याने आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई खेळ आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली आहेत. नीरज चोप्राने आपले भालाफेक कौशल्य सुधारण्यासाठी जर्मनीच्या बायोमेकॅनिक्स तज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नीरज चोप्रासाठी ‘उडे जब जब जुल्फे तेरी’ गाण्यावर थिरकल्या मुली; तर ‘गोल्डन बॉय’ झाला लाजून चूर
मोदींनी शब्द पाळला!! नीरज चोप्रासोबत चुरमाचा, तर पीव्ही सिंधूबरोबर घेतला आईस्क्रीमचा आस्वाद
एकेकाळी टोकियो आलिंपिक खेळण्याची आशा सोडलेल्या नीरज चोप्राने भावनिक पोस्ट करत मानले ‘यांचे’ आभार