विराटच्या वडिलांचे निधन झाल्यावर दिल्ली संघाचा कर्णधार मिथून मन्हास आणि त्यावेळचे प्रशिक्षक चेतन चौहान यांनी त्याला घरी परतण्याची सल्ला दिला होता. पण विराटने तो मान्य केला नाही. बिष्टने पुढे बोलताना सांगितले की, “चेतन सर आणि मिथून भाई दोघांना वाटले की, एवढ्या कमी वयात त्याला हा धक्का पचवणे अवघड जाईल. संघातील सर्वांचे हेच मत होते की, त्याने घरी परतले पाहिजे. मात्र, विराट वेगळ्याच मातीचा बनलेला होता.”
“विराटने स्वतःचे दुःख विसरून जबरदस्त चिकाटी दाखवली होती. त्याने काही अप्रतिम फटके खेळले. मैदानात आमच्यात खूप कमी चर्चा झाली. तो येऊन फक्त एवढेच म्हणायचा की, मोठी खेळी खेळायची आहे, विकेट सोडायची नाहीय. मला समजत नव्हते की, त्याला काय म्हणू. मला वाटायचे की, त्याच्या डोक्यावर हात ठेऊन त्याचे सांत्वन करावे. पण मन म्हणायचे की नाही, आपल्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. एवढी वर्ष उलटून गेली, तरीही विराट १७ वर्षांचाच वाटतो. त्याच्यात काहीच बदल झाला नाहीय.”
या घटनेला आता १६ वर्ष झाली आहेत. पण बिष्टला हा संपूर्ण प्रसंग जसाच्या तसा आठवत आहे. बिष्ट जवळपास १० वर्ष दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करत होता. त्याने ९६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये दिल्ली संघासाठी ४३७८ धावा केल्या. असे असले तरी, युवा विराटसोबत ती भागीदारी त्याच्यासाठी सर्वात अविस्मरणीय होती. बिष्टने त्या सामन्यात १५६, तर विराटने ९० धावा केल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या –
हिटमॅनच्या ताफ्यात ‘ड्रीम कार’! कोट्यवधींची किंमत तर, वापरणारे मोजकेच भारतीय
चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत डेक्कन चार्जर्स व टायगर्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत