fbpx
Wednesday, January 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रैनाच्या ट्वीटची घेतली पंजाब सरकारने दखल; उचलले मोठे पाऊल

Punjab Government took Action on Suresh Raina Tweet

September 2, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/IPL

Photo Courtesy: Twitter/IPL


भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनाच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्याबाबत आता पंजाब सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. रैनाच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्याची तपासणी विशेष तपास पथक (एसआयटी) करणार आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी रैनाच्या कुटुंबाची दखल घेतली आहे.

रैनाने सोमवारी (३१ ऑगस्ट) सलग २ ट्वीट करत मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना झालेल्या घटनेची तपासणी करण्यासाठी विनंती केली होती. रैनाची आत्या आणि त्यांच्या कुटुंबावर पठाणकोटमध्ये हल्ला झाला होता, त्यात रैनाच्या मामांचा (आत्याचे पती) आणि आतेभावाचा मृत्यू झाला आहे.

रैनाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून लिहिले होते की, ‘माझ्या कुटुंबासोबत जे काही झाले, ते भयानक होते. आणि आम्हाला हल्लेखोरांबाबत माहिती घेण्याचा अधिकार असला पाहिजे. त्या हल्लेखोरांना शिक्षा ही झालीच पाहिजे, जेणेकरून अशाप्रकारचा हल्ला पुन्हा होऊ नये.’

रैनाच्या कुटुंबातील २ व्यक्तींचा मृत्यू

“माझ्या मामांची हत्त्या करण्यात आली. यानंतर माझ्या आतेभावाचाही मृत्यू झाला आहे. रुग्णालयात आत्याची तब्येत गंभीर झाली आहे,” असेही आपल्या ट्वीटमध्ये रैनाने म्हटले. तसेच त्याने पंजाब पोलिसांची मदत मागितली होती.

What happened to my family is Punjab was beyond horrible. My uncle was slaughtered to death, my bua & both my cousins had sever injuries. Unfortunately my cousin also passed away last night after battling for life for days. My bua is still very very critical & is on life support.

— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) September 1, 2020

Till date we don’t know what exactly had happened that night & who did this. I request @PunjabPoliceInd to look into this matter. We at least deserve to know who did this heinous act to them. Those criminals should not be spared to commit more crimes. @capt_amarinder @CMOPb

— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) September 1, 2020

या प्रकरणाची तपासणी करत असलेल्या अधिकाऱ्याने म्हटले की, याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नसून कोणत्याही व्यक्तीला अटक केले नाही.

१९ ऑगस्टला रात्री उशीरा पठाणकोटच्या थारियाल गावात ही घटना घडली होती. त्यावेळी कुटुंबातील सदस्य त्यांच्या घराच्या टेरेसवर झोपले होते. तेव्हा काही अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक शस्त्रांसह हल्ला केला होता. या घटनेमुळे रैना आयपीएलमधून परतल्याचाही अंदाज अनेकांनी लावला होता. पण नंतर रैनाच्या आयपीमधून माघार घेण्यामागे वेगळी कारणे असल्याचेही समोर आले होते.

रैनाने आयपीएलमध्ये हॉटेलच्या खोलीबाबत नाराजी व्यक्त करत न खेळण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे सर्वेसर्वा एन श्रीनिवासन यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. त्यांनी असेही म्हटले होते की, यश हे रैनाच्या डोक्यावर चढले आहे.

आयपीएलच्या १३ व्या हंगामाला १९ सप्टेंबरपासून यूएईत सुरुवात होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-अखेर इंग्लंड विश्वविक्रम करण्यापासून थोडक्यात चुकले, नाहीतर….

-सचिनच्या आयपीएलमधील विकेटने ‘त्या’ भारतीय गोलंदाजाला मिळाले होते अतिशय महागडे गिफ्ट

-ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भविष्यवाणी, पॉइंट्स टेबलमध्ये या क्रमांकावर असणार मुंबई इंडियन्स

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून खेळत आहेत हे ३ परदेशी खेळाडू

-असे ५ परदेशी क्रिकेटर, जे आयपीएलमधून कमवतात सर्वाधिक पैसे

-आयपीएलमधील ५ अशा टीम, ज्यांनी खेळाडूंवर खर्च केलाय पाण्यासारखा पैसा


Previous Post

आयपीएल २०२०: युएईतील मैदान गाजवणार हे ५ गोलंदाज, फलंदाजांची करणार दांडी गुल

Next Post

१०वी नापास भारतीय क्रिकेटर, ज्याने वयाच्या केवळ २०व्या वर्षी ऑस्ट्रेलियन दिग्गजाच्या आणली होते नाकी नऊ

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

आता तयारी इंग्लंड विरुद्ध दोन हात करण्याची! पाहा पुण्यासह आणखी कुठे आणि कधी होणार टीम इंडियाचे सामने

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@OdishaFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : तळातील ओदिशाने हैदराबादला बरोबरीत रोखले

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricketcomau
टॉप बातम्या

शानदार शुभमन…! स्टार्कच्या चेंडूला भिरकवले मैदानाबाहेर, पाहा व्हिडिओ

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

अबब! पुजाराने ऑस्ट्रेलियात खेळले आहे तब्बल ‘इतके’ चेंडू

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

नुसता विजय नाय तर थरारक विजय! भारतीय संघाच्या कामगिरीवर छत्रपती संभाजीराजेंकडून कौतुकाची थाप; म्हणाले

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

केव्हिन पीटरसनचे चक्क हिंदीत ट्विट, ‘या’ कारणासाठी दिला भारताला सावधगिरीचा इशारा  

January 19, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ BCCI

१०वी नापास भारतीय क्रिकेटर, ज्याने वयाच्या केवळ २०व्या वर्षी ऑस्ट्रेलियन दिग्गजाच्या आणली होते नाकी नऊ

Photo Courtesy: Twitter/ ICC

वयाची चाळीशी जवळ आली तरी 'या' क्रिकेटरची नाही तोड, नोंदवलाय टी२० कारकिर्दीतील मोठा पराक्रम

Photo Courtesy: Twitter/ mipaltan

मुंबई इंडियन्सच्या हा शिलेदार अडकला होता चक्क चीयरलीडरच्या प्रेमात, आज तीच आहे...

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.