यंदाच्या आयपीएल हंगामातील (IPL 2025) 31वा सामना आज (15 एप्रिल) पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (PBKS vs KKR) संघात खेळला गेला. हा सामना पंजाब किंग्सच्या घरच्या मैदानावर रंगला होता. दरम्यान पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि कोलकाता नाईट रायडर्सला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यादरम्यान पंजाबने केकेआरसमोर 112 धावांचे आव्हान ठेवले होते. पण केकेआरचा संघ हे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरला आणि पंजाब किंग्जने केकेआरवर 16 धावांनी शानदार विजय मिळवला.
112 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात खूपच खराब झाली. दोन्ही सलामीवीर 7 धावांवर बाद झाले. क्विंटन डी कॉक 2 धावा काढून बाद झाला आणि सुनील नरेन फक्त 5 धावा काढून बाद झाला. या कमी धावसंख्येच्या सामन्यात, अंगकृष रघुवंशी आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी 55 धावांची भागीदारी करून केकेआरच्या विजयाच्या आशा वाढवल्या. या सामन्यात कोलकाताकडून रघुवंशी सर्वाधिक 37 धावा करणारा फलंदाज ठरला. दुसरीकडे, रहाणेने 17 धावा केल्या.
112 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरने एका क्षणी 3 गडी गमावून 72 धावा केल्या. यानंतर, अंगकृष रघुवंशीच्या बाद होण्यापासून सुरू झालेला हा क्रम थांबला नाही आणि कोलकाता संघाने अवघ्या 7 धावांत 5 विकेट्स गमावल्या. यादरम्यान व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, रमणदीप सिंग आणि हर्षित राणा यांच्या विकेट्स पडल्या.
केकेआर संघाची स्थिती बिघडवण्यात युजवेंद्र चहलचा सर्वात मोठा वाटा होता. त्याने 4 षटकांत फक्त 28 धावा देऊन 4 महत्त्वाच्या विकेट्स आपल्या खिशात घातल्या. चहलने अजिंक्य रहाणे आणि विशेषतः अंगकृष रघुवंशी यांच्या विकेट्स घेऊन सामना पंजाबच्या बाजूने वळवला. याशिवाय त्याने रिंकू सिंग आणि रमनदीप सिंग यांच्या विकेटही घेतल्या. चहलच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे पंजाबला सामना जिंकला आला.