कोविड-१९ महामारीमुळे इंडियन प्रीमियर लीगचा तेरावा हंगाम युएईत खेळवल्यानंतर आयपीएलचे भारतात पुनरागमन होत आहे. नुकतेच बीसीसीआयने आयपीएल २०२१ च्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या हंगामातील पहिला सामना ९ एप्रिल रोजी गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर रंगणार आहे. तर अंतिम सामना ३० मे रोजी अहमदाबाद येथे होईल. दरम्यान पंजाब किंग्ज संघाची सहमालक प्रीती झिंटा हिने वेळापत्रकावर प्रतिक्रिया दिली आहे.
घरच्या मैदानावर एकही सामना खेळण्याची संधी नाही
या हंगामातील साखळी फेरीचे सामने अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे खेळवण्यात येतील. तर अहमदाबादच्या पुनर्बांधणी केलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच प्लेऑफचे सर्व सामने खेळवले जातील. हंगामातील एकूण ५६ साखळी फेरी सामन्यातील सर्वाधिक १० सामन्यांचे यजमानपद चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरू या शहरांना देण्यात आले आहे. अहमदाबाद आणि दिल्ली येथे प्रत्येकी ८ सामने होतील.
अशाप्रकारे प्रत्येक संघाला एकूण ६ ठिकाणांपैकी चार वेगवेगळ्या ठिकाणी साखळी फेरीचे सामने खेळण्याची संधी मिळेल. यामुळे या हंगामात कोणताही संघ घरच्या मैदानावर सामने खेळणार नाही. सर्व संघ तटस्थ ठिकाणांवर सामने खेळतील. याबरोबरच कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता हंगामातील पहिला टप्प्यात प्रेक्षकांविना सामने खेळवले जातील. त्यानंतर पुढच्या टप्प्यात प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश द्यायचा की नाही याबद्दल निर्णय घेतला जाईल.
हे थोडसं विचित्र वाटत आहे
याबाबत बोलताना बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा म्हणाली की, ‘आयपीएलचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. पंजाब किंग्जचा पहिला सामना आमची मुंबई येथे खेळवला जाईल. त्यानंतर चेन्नई, अहमदाबाद आणि बंगळुरू येथे आमचे साखळी फेरी सामने होतील. मात्र एकाही संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळणार नाही. हे थोडस विचित्र वाटत आहे. याखेरीज प्रेक्षकांनाही स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली गेली नाही.’
IPL schedule is finally here & @PunjabKingsIPL starts #IPL2021 in amchi Mumbai then travels to Chennai, Ahmedabad & Bangalore for our league matches. It’s a weird feeling that no teams will play any matches at their home venues & there will be no crowds in the stadiums as of now.
— Preity G Zinta (@realpreityzinta) March 7, 2021
यंदा पंजाबचा पहिला आयपीएल सामना १२ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबईत होणार आहे. त्यांच्या साखळी फेरीतील १४ सामन्यांपैकी ११ सामने रात्री ७.३० वाजता सुरू होतील. तर उर्वरित २ सामने दुपारी ३.३० वाजता खेळवले जातील.
A royal clash to begin with! 💥
Which match are you looking forward to the most? 🤩#IPL2021 #IPLSchedule #SaddaPunjab #PunjabKings pic.twitter.com/I2xFMipXHm
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) March 7, 2021
असे आहे आयपीएल २०२१मधील किंग्स इलेव्हन पंजाब संघाच्या साखळी सामन्यांचे वेळापत्रक –
१६ एप्रिल – मुंबई, पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
१८ एप्रिल – मुंबई, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
२१ एप्रिल – चेन्नई, पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वाजता
२३ एप्रिल – चेन्नई, पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२६ एप्रिल – अहमदाबाद, पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, संध्याकाळी ७.३० वाजता
३० एप्रिल – अहमदाबाद, पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, संध्याकाळी ७.३० वाजता
२ मे – अहमदाबाद, पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
६ मे – अहमदाबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
९ मे – बंगळुरू, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज, दुपारी ३.३० वाजता
१३ मे -बंगळुरू, मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग, दुपारी ३.३० वाजता
१५ मे – बंगळुरू, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
१९ मे – बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
२२ मे – बंगळुरू, पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
महान कर्णधार, बीसीसीआय अध्यक्ष आता ‘दादा’ चढणार का राजकारणाची पायरी? म्हणतो, “बघू संधी…”
अवघ्या अठराव्या वर्षी पार्थिव पटेलने खेळला चक्क विश्वचषक; वाचा कशी झाली कारकिर्दीची सुरुवात
धुलाई केल्यानंतरही निशामने जर्सी देत मॅक्सवेलला दिला ‘हा’ संदेश, लिहिले…