Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंजाबला नाकारून संकटात अडकला राहुल! फ्रँचायझीने बीसीसीआयला तक्रार करत म्हटले, ‘त्याने नव्या टीमला कॉल…’

December 2, 2021
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/ IPL

Photo Courtesy: Twitter/ IPL


इंडियन प्रीमियर लीग २०२२ चे (आयपीएल २०२२) बिगुल वाजले असून लवकरच या हंगामाचा मेगा लिलावही पार पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्याच्या अंती अर्थात ३० नोव्हेंबर रोजी आयपीएलच्या या १५ व्या हंगामाची रिटेंशन प्रक्रिया पार पडली आहे. यादरम्यान आयपीएलचे एकही जेतेपद न पटकावू शकलेल्या पंजाब किंग्ज संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा कर्णधार केएल राहुल याने स्वत:ला संघात रिटेन करण्यासाठी नकार दिला आहे.

यानंतर फ्रँचायझी त्याच्या या निर्णयावर नाराज आहे. त्यांनी हे बीसीसीआयच्या नियमांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. २०२० मध्ये पंजाब किंग्जने संघनायक आर अश्विनच्या जागी राहुलला संधी दिली होती.

पंजाब किंग्जचे सहमालक नेस वाडिया यांनी राहुलच्या या निर्णयावरुन नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “आम्ही खरोखरच राहुलला रिटेन करू इच्छित होतो. तो संघाचा कर्णधार असल्याने त्याला निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. परंतु त्याला लिलावात उतरायचे होते. जर इतर कोणत्या संघाने त्याच्यावर दबाव आणून आमचा संघ सोडण्यास म्हणजेच त्यांच्या संघात सहभागी होण्यासाठी मनवले असेल, तर हे बेकायदेशीर आहे.” 

राहुल लिलावात उतरल्यानंतर नव्या लखनऊ संघात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना वाडिया म्हणाले की, “आम्ही अपेक्षा करतो की, असे काहीही नाही. कारण हे बीसीसीआयच्या नियमांच्या विरोधात असेल.”

यापूर्वी २०१० मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू रविंद्र जडेजा याच्यावर अशा कृतीमुळे एक वर्षाचे प्रतिबंध झेलण्याची वेळ आली होती. त्यावेळी राजस्थान रॉयल्स संघाने त्याला संघमुक्त करण्यापूर्वीच त्याने इतर संघांशी संपर्क साधायला सुरुवात केली होती. त्यामुळे आता जर हे प्रकरण खरे निघाले तर, राहुलवरही बंदी लागू शकते.

पंजाब किंग्जने रिटेन केले फक्त २ खेळाडू
राहुलने नकार दिल्यानंतर प्रीती झिंटा सहसंघमालकिण असलेल्या पंजाब किंग्स संघाने केवळ २ खेळाडू संघात कायम ठेवले आहेत. मयंक अगरवाल आणि अर्शदीप सिंग या दोन खेळाडूंना कायम केले आहे. पंजाब किंग्जने सलामीवीर फलंदाज मयंकसाठी १२ कोटी रुपये खर्च केले आहेत. तर वेगवान गोलंदाज अर्शदीपला ४ कोटींसह संघात कायम ठेवले आहे. त्यामुळे आता लिलावासाठी संघाकडे तब्बल ७४ कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

तब्बल ५ वर्षानंतर वानखेडेवर रंगणार कसोटी, असा राहिला आहे भारताचा या मैदानावरील इतिहास

मेगा लिलावापूर्वी नव्या संघांना ३ खेळाडू विकत घेण्याची मुभा, पण कोणावर किती खर्च करू शकतील टीम?

सातत्याने फ्लॉप ठरूनही रहाणे, पुजाराच्या पाठिशी उभा आहे संघ; इशांतविषयीही गोलंदाजी प्रशिक्षक म्हणाले…


Next Post
Team-India

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात केवळ २ हॉटेलमध्ये थांबेल भारतीय संघ, दर्शकही असतील मर्यादित; वाचा गाइडलाइन्स

Virat Kohli

टी२० नंतर आता विराट कोहली वनडेचेही कर्णधारपद गमावणार? लवकरच घेतला जाणार निर्णय

Photo Courtesy: Twitter/ICC

ठरलं तर! ऍशेसमध्ये यष्टीमागे पेनची जागा घेणार 'हा' खेळाडू, कसोटी पदार्णाचीही मिळणार संधी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143