Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंजाबने केला आयपीएल 2023 च्या सरावाचा श्रीगणेशा! गब्बर म्हणतोय, ‘शेर आये है’

February 25, 2023
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Instagram/Shikhar Dhawan

Photo Courtesy: Instagram/Shikhar Dhawan


जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा पुढील हंगाम मार्च महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात अपयशी संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंजाब किंग्सने सर्वात आधी सरावाला सुरुवात केली. पंजाबचा कर्णधार शिखर धवन याने सोशल मीडिया पोस्ट करत याबाबत माहिती दिली.

पंजाब किंग्स आयपीएलच्या सर्व हंगामात सहभागी होणार संघ आहे. या 15 हंगामात पंजाब केवळ एकदाच अंतिम फेरी गाठू शकला आहे. त्यातही त्यांना पराभव पत्करावा लागला होता. या नव्या हंगामात पंजाब आपले पहिले विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी संघाचे नेतृत्व भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन याच्या खांद्यावर देण्यात आले आहे. मागील वर्षी संघाचे नेतृत्व केलेल्या मयंक अगरवाल याला रिलीज केल्यानंतर धवनकडे ही जबाबदारी आली.

View this post on Instagram

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

नव्या हंगामासाठी पंजाबने शनिवारी (25 फेब्रुवारी) सरावाला सुरुवात केली. शिखरने सोशल मीडिया पोस्ट करताना लिहिले,

‘सिंह आपल्या जंगलात परत आले आहेत.’ शिखरला पंजाबने 2022 आयपीएल लिलावावेळी साडेआठ कोटींपेक्षा जास्तची रक्कम देत आपल्या संघात सामील करून घेतले होते. या हंगामात पंजाब आपला पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध खेळेल.

आयपीएल 2023 साठी पंजाब किंग्स संघ-

शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, अथर्व तायडे, हरप्रीत ब्रार, लियाम लिव्हिंगस्टोन, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, राज अंगद बावा, रिषी धवन, शाहरुख खान, अर्शदीप सिंग, बलतेज धांडा, सॅम करन, सिकंदर रझा, हरप्रीत भाटिया, विद्वथ कवीरप्पा, मोहित राठी, शिवम सिंग, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, राहुल चहर.

(Punjab Kings Starts Practice Ahead IPL 2023 Shikhar Dhawan Social Media Post)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ सात कर्णधारांनी भारतात नाही जिंकली एकही कसोटी, विश्वविजेते तिघेही पराभूत
“ती काय जॉगिंग करत होती?” माजी भारतीय कर्णधार हरमनप्रीतवर संतापल्या, दिला ‘हा’ धडा

 


Next Post
Team India

युपी वॉरियर्झने WPL साठी निवडली आपली उपकर्णधार! 'या' भारतीय खेळाडूला मिळाला मान

Team-India

मुलींना पाहताच धूम ठोकणारा भारतीय खेळाडू कोण? सर्वात आळशी क्रिकेटरचे नाव ऐकून तुम्हालाही बसेल झटका

Reliance

दिनेश कार्तिकने झुंजार खेळी करूनही संघाच्या पदरी अपयश; फायनलमध्ये रिलायन्सचा शानदार विजय

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143