---Advertisement---

LSG vs PBKS: लखनऊचा शानदार पराभव करत पंजाब किंग्सने 8 विकेट्सने सामना जिंकला

---Advertisement---

आयपीएल 2025 मधील तेरावा सामना आज लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळला गेला. हा सामना पंजाब किंग्स संघाने 8 विकेट्सने जिंकला. लखनऊच्या घरच्या मैदानावर पंजाबने 22 चेंडू राखून 16.2 षटकात विजय मिळवला आहे. पंजाबने 2 खेळाडू गमावून 177 धावा केल्या.

लखनऊने प्रथम फलंदाजी करताना 171 धावा केल्या होत्या. नंतर धावांचा पाठलाग करताना पंजाबसाठी सर्वात जास्त धावा प्रभसिमरन ने केल्या. त्याने 34 चेंडूत 69 धावांची तुफानी पारी खेळली. तसेच कर्णधार श्रेयस अय्यरने अर्धशतक पूर्ण केले. त्याने 30 चेंडूत 52 धावा केल्या. त्यानंतर नेहाल वडेराने 25 चेंडूत 43 धावा केल्या. आज लखनऊ संघाला तसेच फलंदाजांना पंजाबच्या गोलंदाजांनी काही खास कामगिरी करू दिली नाही. लखनऊ संघासाठी 2 विकेट्स दिग्वेश सिंगने घेतल्या.

लखनऊसाठी प्रथम फलंदाजी करताना संघासाठी सर्वोत्तम धावा निकोलस पुरण (44) आणि बडोनी (41) यांनी केल्या.
एडन माक्रमने 18 चेंडूत 28 धावा, मिलर 18 चेंडूत 19 धावा केल्या. कर्णधार ऋषभ पंत अवघ्या दोन धावांवर परत गेला तो आज काही खास कामगिरी करू शकला नाही.

पंजाब साठी सर्वोत्तम गोलंदाजी अर्शदीप सिंगने केली. त्याने चार षटकात 41 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. बाकी गोलंदाजांनी एक- एक विकेट्स घेतल्या.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---